Bhendi Bazaar : मिळतात सगळे अँटिक पीस, पण नाव भाजीचं; मुंबईतील भेंडी बाजारचं भेंडीशी कनेक्शन काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bhendi Bazaar Name Story : मुंबईतील एक खूप जुनी बाजारपेठ ज्याचं नाव आहे 'भिंडी बाजार किंवा भेंडी बाजार'. पण इथं भेंडीत काय कोणतीच भाजी नाही तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतात. मग या जागेचं नाव भाजीवरून का?
advertisement
1/5

भेंडी बाजार किंवा भिंडी बाजार देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एक खूप जुनी बाजारपेठ आहे, या बाजाराला चोर बाजार या नावानेही ओळखलं जातं.
advertisement
2/5
हे मार्केट दक्षिण मुंबईत मोहम्मद अली रोड ते खेतवाडी दरम्यान आहे. या मार्केटचं सर्वात जवळचं स्टेशन मुंबई हार्बर लाईनवरील सँडहर्स्ट रोड स्टेशन आहे. याशिवाय वेस्टर्न लाईनवरील चर्नी रोड आणि ग्रँट रोड स्थानकांवरूनही इथं जाता येतं.
advertisement
3/5
या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सहज मिळू शकतात. इथं तुम्हाला इतर देशांतून आयात केलेली इलेक्ट्रॉनिक उत्पादनंही चांगल्या किमतीत मिळतील. अँटिक वस्तूंसाठीही हे बाजार फेमस आहे. तरी या बाजाराला भेंडी या भाजीचं नाव ठेवलं आहे? का? या बाजाराचं भेंडीशी काय संबंध आहे?
advertisement
4/5
विशेष म्हणजे या बाजाराचा भेंडीच्या भाजीशी काहीही संबंध नाही. इथे ना भेंडी मिळते ना दुसरी भाजी. आता तुम्ही विचार करत असाल की मग भाजीचं नाव का ठेवलं?
advertisement
5/5
खरंतर हा बाजार ब्रिटिशकालीन आहे. ब्रिटीश काळात या ठिकाणाचं नाव बिहाइंड द बझार असं होतं. पण मुंबईत राहणाऱ्या मूळ लोकांच्या ओठावर येताच त्याचं नाव बदललं, भेंडीबाजार झालं. हिंदी भाषिक भिंडीबाजार असं म्हणू लागले. तेव्हापासून सगळे या मार्केटला भेंडीबाजार किंवा भिंडीबाजार म्हणूनच ओळखतात. इथं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील लोकप्रिय भेंडीबाजार घराणा देखील आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Bhendi Bazaar : मिळतात सगळे अँटिक पीस, पण नाव भाजीचं; मुंबईतील भेंडी बाजारचं भेंडीशी कनेक्शन काय?