पूर्वी कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवरील हा वॉलपेपर, कुठलं आहे हे ठिकाण? आता कसं दिसतं पाहा Photo
- Published by:Priya Lad
Last Updated:
Computer desktop wallpaper : हा फोटो मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्टममध्ये दिसत होता. या प्रतिमेला विंडोज एक्सपी 'ब्लिस' असं नाव देण्यात आलं.
advertisement
1/7

जर तुम्ही 2000 च्या दशकात कॉम्प्युटर वापरला असेल तर त्याच्या डेस्कटॉपवर हा वॉलपेपर नक्कीच पाहिला असेल. निळं आकाश, पांढरे ढग आणि हिरवं गवत असलेलं डोंगर. हा फोटो मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्टममध्ये दिसत होता. या प्रतिमेला विंडोज एक्सपी 'ब्लिस' असं नाव देण्यात आलं आहे.
advertisement
2/7
पण तुम्हाला माहिती आहे का हे ठिकाण कुठे आहे? हा फोटो 1996 मध्ये चार्ल्स ओरियर नावाच्या फोटोग्राफरने काढला होता. हा फोटो कॅलिफोर्नियातील सोनोमा काउंटीमध्ये घेण्यात आला आहे.
advertisement
3/7
पावसामुळे हिरवळ दिसत असताना चार्ल्सने हायवे 12 जवळ हे दृश्य पाहिलं. त्यावेळी तो 25 वर्षांचा होता आणि नॅशनल जिओग्राफिकमध्ये काम करत होता. त्यावेळी चार्ल्स हे अशा निवडक छायाचित्रकारांपैकी एक होता ज्यांनी कॉर्बिस नावाच्या सेवेद्वारे त्यांचं फोटो डिजिटायझेशन केलं आणि परवाना दिला.
advertisement
4/7
त्यावेळी कॉर्बिस मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल गेट्स यांच्या मालकीचे होते. मायक्रोसॉफ्टला चार्ल्सचा फोटो आवडला आणि कंपनीने चार्ल्सला पैसे देऊन तो फोटो विकत घेतला.
advertisement
5/7
इन्स्टाग्राम पोस्टनुसार, लोकांना वाटतं की हा फोटो खूप एडिट केलेला असावा, पण तसं नाही. फोटोमध्ये खरे रंग दिसतात. पण आता हे ठिकाण खूप बदललं आहे.
advertisement
6/7
या ठिकाणाचे नवीन फोटो अलिकडेच @insidehistory या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत. ज्यात हे ठिकाण कसं बदलत गेलं ते दाखवण्यात आलं.
advertisement
7/7
या पोस्टमध्ये तुम्ही 2025 मध्ये हे ठिकाण कसं दिसतं ते पाहू शकता. आता हिरवळ, ढग आणि गवत यांचा रंग पूर्वीसारखा राहिलेला नाही. पण तरीही हे ठिकाण झाडांनी आणि वनस्पतींनी व्यापलेलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
पूर्वी कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवरील हा वॉलपेपर, कुठलं आहे हे ठिकाण? आता कसं दिसतं पाहा Photo