TRENDING:

तिरुपतीनंतर सिद्धिविनायकचा लाडूही वादात! महाप्रसादाच्या पाकिटात उंदीर; किळसवाणे Photo समोर

Last Updated:
तिरुपतीच्या लाडूवरून वाद सुरूच आहे. तोच आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील लाडू चर्चेत आला आहे. प्रसादाच्या पाकिटात उंदरांचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.
advertisement
1/7
तिरुपतीनंतर सिद्धिविनायकचा लाडू वादात! प्रसादाच्या पाकिटात उंदीर; किळसवाणे फोटो
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाचा व्हिडीओ आता व्हायरल होत असून त्यात प्रसाद ठेवलेल्या ट्रेमध्ये उंदराने पिल्लांना जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
advertisement
2/7
सिद्धिविनायक मंदिराकडून भाविकांना वाटण्यात येणाऱ्या महाप्रसादाच्या लाडूच्या पॅकेटवर ही उंदराची पिल्ले होती. तर काही पाकिटं उंदरांनी कुरतडली होती असंही दिसलं आहे.
advertisement
3/7
सिद्धिविनायक मंदिर परिसरात दररोज प्रसादासाठी 50 हजार लाडू तयार करण्यात येतात. सणांच्या वेळी लाडूची मागणी वाढते. प्रसादासाठी 50 ग्रॅमचे दोन लाडू पाकिटात दिले जातात.
advertisement
4/7
अन्न आणि औषध प्रशासनाकडून लाडूसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी प्रमाणपत्र दिलं जातं. लॅब टेस्टनुसार, महाप्रसादाचे हे लाडू आठवडाभर टिकू शकतात. दरम्यान, लाडूच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं सापडल्यानं स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
advertisement
5/7
प्रसादाच्या शुद्धतेबाबतही आता शंका व्यक्त करण्यात येतेय. यावर मंदिर प्रशासनाला विचारले असता मंदिर प्रशासनाकडून याची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
advertisement
6/7
प्रसादाच्या पाकिटाचे आणि ट्रेमध्ये असलेल्या उंदरांच्या पिल्लांचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात महाप्रसाद ठेवलेल्या ट्रेमध्ये उंदराची पिल्लं स्पष्ट दिसत आहेत.
advertisement
7/7
ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी हे फोटो मंदिराच्या आतले नसल्याचं म्हटलंय. ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी म्हटलं की, फोटोंची पडताळणी करावी लागेल. सीसीटीव्ही फूटेजसुद्धा चेक केले जाईल. पण याचे व्हिडीओ आम्हाला द्यावेत, याची आम्ही चौकशी करू असं म्हटलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
तिरुपतीनंतर सिद्धिविनायकचा लाडूही वादात! महाप्रसादाच्या पाकिटात उंदीर; किळसवाणे Photo समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल