Simpsons च्या 2026 साठीच्या 4 भविष्यवाणी! 8 दिवसांतच 3 खऱ्या ठरल्या; आता चौथीचा नंबर, जी सगळ्यात भयानक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Simpsons Predictions For 2026 : सिम्पसन्स या कार्टुन शोमध्ये दाखवण्यात आलेल्या बऱ्यापैकी गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे हे कार्टुन भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहे.
advertisement
1/5

द सिम्पसन्स 1989 पासून सुरू असलेला अ‍ॅनिमेटेड शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा शो भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे जगात जे काही घडतं आहे, ते या कार्टुनमध्ये आधीच दाखवण्यात आलं आहे. ट्रम्पचे राष्ट्राध्यक्ष होणं, ट्विटरचे एक्स होणं आणि लेडी गागाचा सुपर बाउल परफॉर्मन्स, हे सर्व आधीच शोमध्ये दाखवण्यात आलं होतं. आता सिम्पसन्समधील 2026 साठीची 4 भविष्यवाणी व्हायरल होत आहेत, त्यापैकी तीन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच खरी ठरली आहेत.
advertisement
2/5
त्यापैकी एक म्हणजे जपानमधून आलेला फ्लूचा एक प्रकार स्प्रिंगफील्डमध्ये साथीचा रोग बनला आहे. याचा संबंध H3N2 सबक्लेड K शी जोडत आहेत, ज्याला युनायटेड स्टेट्समध्ये सुपरफ्लू म्हटलं जात आहे. सीडीसीनुसार या हंगामात बहुतेक आजार या प्रकारामुळे झाले आहेत. 1 कोटींहून अधिक रुग्ण आढळले आहेत. लाखो रुग्ण रुग्णालयात आहेत आणि 5000 मृत्यू झाले आहेत. यावर लसही प्रभावी ठरत नाही आहे कारण हे नवीन म्युटेशन आहे.
advertisement
3/5
दुसरं म्हणजे स्मार्ट होम्स, होमर त्याच्या घराला फ्युचिरिस्टिक बनवतो पण ते नियंत्रणाबाहेर जातं. 2026 मध्ये हे वास्तव आहे. सर्वक्षणांनुसार 80 टक्क्यांपेक्षा जास्त अमेरिकन घरांमध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे. रेफ्रिजरेटर, डोअरबेल, रोबोट व्हॅक्यूम, व्हॉइस कंट्रोल आणि ऑटोमेशन सामान्य आहेत. पण गोपनीयता आणि हॅकिंगबद्दल देखील भीती आहे.
advertisement
4/5
तिसरी भविष्यवाणी एआयमुळे नोकऱ्या संपुष्टात. मिस्टर बर्न्स कामगारांच्या जागी रोबोट आणतात, पण रोबोट चुकतात. आज स्टॅनफोर्ड आणि चॅटजीपीटीच्या अहवालांनुसार पुढील दशकात एआय अमेरिकेत 100 दशलक्षांहून अधिक नोकऱ्या घेऊ शकतं. एआय-सक्षम उद्योगांमध्ये 22-25 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी नोकऱ्यांमध्ये 13% घट झाली आहे. एआयमुळे कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. शोमध्ये ते व्यंग्य म्हणून दाखवण्यात आलं होतं, पण आता ते भयानक खरं वाटतं.
advertisement
5/5
आता सर्वांच्या नजरा चौथ्या आणि शेवटच्या भविष्यवाणीवर आहेत. चौथं आणि सर्वात भयानक भाकित तिसरं महायुद्ध. 1987 च्या शॉर्टमध्ये होमर एका बंकरमध्ये लपून बसतो, त्याला वाटतं की तिसरं महायुद्ध सुरू झालं आहे. 1995 च्या लिसाज वेडिंगमध्ये भविष्यात तिसऱ्या महायुद्धाचा उल्लेख आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्ध पाहता 2026 मध्ये हे खरं होईल का? अशी भीती आता वाटू लागली आहे. या शोमध्ये वारंवार जागतिक संघर्षाचे चित्रण केलं गेले आहे आणि आता तणाव वाढत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Simpsons च्या 2026 साठीच्या 4 भविष्यवाणी! 8 दिवसांतच 3 खऱ्या ठरल्या; आता चौथीचा नंबर, जी सगळ्यात भयानक