TRENDING:

दिवसा वर्ग, रात्री बेडरूम...मुख्याध्यापिकेचे शाळेत नको ते कारनामे! मुलांनी शिकायचं कसं?

Last Updated:
आई-वडिलांनंतर शिक्षकांना देवाच्या स्थानी मानलं जातं. शिवाय शिक्षकांसाठीही शाळा म्हणजे देवघर असतं, पण बिहारचे शिक्षक या देवघरात कधी काय करतील याचा काही नेम नाही. ही बातमी वाचल्यानंतर तुमच्यावरही डोक्याला हात लावण्याची वेळ येईल. (गुलशन कश्यप, प्रतिनिधी / जमुई)
advertisement
1/5
दिवसा वर्ग, रात्री बेडरूम...मुख्याध्यापिकेचे शाळेत नको ते कारनामे!
हे प्रकरण आहे बिहारच्या एका शाळेतलं. जिथल्या वर्गांमध्ये फक्त बेंच, फळा आणि डस्टर नाहीये, तर जोडीला आहे टीव्ही, फ्रिज, कपाट आणि किचनमधलं सर्व सामान. वर्ग आहे की, संसार? पडला ना प्रश्न?
advertisement
2/5
संतापजनक बाब अशी की, या शाळेच्या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांना फक्त शिकवत नाहीत, तर त्याबदल्यात त्यांना मजुरांसारखं राबवून घेतात. जमुई जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे, जिथं मुख्याध्यापिकेनं शाळेतच तिचा संसार थाटलाय आणि तिच्या घरातली सर्व कामं करून घेतली जातात विद्यार्थ्यांकडून.
advertisement
3/5
शीला हेमब्रम असं या मुख्याध्यापिकेचं नाव. तिने शाळा सर्व ऐषोआरामाच्या वस्तूंनी सजवली आहे. लज्जास्पद म्हणजे ज्या वर्गात दिवसा विद्यार्थ्यांना माणुसकीचे धडे दिले जातात, ती ज्ञानाची पवित्र वास्तूच रात्री मॅडमचं बेडरूम होते. जिथं मॅडम त्यांच्या नवऱ्यासोबत राहतात.
advertisement
4/5
या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी शिकतात. परंतु शाळेत खोल्या आहेत तीनच. एका खोलीत पहिली ते तिसरीचे विद्यार्थी बसतात. दुसऱ्या खोलीत चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी बसतात, तर तिसऱ्या खोलीत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकत्रच शिकवलं जातं. ही दयनीय अवस्था कमी की काय, तर मुख्याध्यापिकेनं या तीन खोल्यांच्या शाळेला आपलं 1 बीएचके बनवलं.
advertisement
5/5
या संपूर्ण प्रकरणावर मुख्याध्यापिकेनं स्पष्टीकरण देताना सांगितलं की, तिला घर बांधायचंय परंतु त्यासाठी जागा नाहीये म्हणून तिने शाळा राहण्यासाठी वापरली. परंतु घरातली कामं विद्यार्थ्यांकडून का करून घेतली जातात, याबाबत काही स्पष्टीकरण आलेलं नाही. आता या प्रकरणावर जिल्हाधिकारी राकेश कुमार यांच्या आदेशानुसार तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
दिवसा वर्ग, रात्री बेडरूम...मुख्याध्यापिकेचे शाळेत नको ते कारनामे! मुलांनी शिकायचं कसं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल