Richest village in India : 7600 घरे, 17 बँका; भारतातील या श्रीमंत गावाविषयी माहितीय का? याच्यापुढे मुंबई-दिल्लीही फेल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
भारतात अनेक गावं आहेत. प्रत्येक गावाची एक वेगळी अशी खासियत आहे. मात्र भारतातील सर्वात श्रीमंत गावाविषयी तुम्हाला माहितीय का?
advertisement
1/7

गाव म्हटल्यावर कच्चे रस्ते, कमी सुविधा हे पहिलं डोक्यात येतं. मात्र भारतात असंही एक गाव आहे जे सगळ्या सुविधांनी समृद्ध आहे आणि श्रीमंतही.
advertisement
2/7
भारतातील या श्रीमंत गावात जास्त करुन एनआरआय लोक राहतात. या गावाचं नाव देशातील श्रीमंत गावांच्या लिस्टमध्ये येतं. या गावात 7600 घरे, 17 बॅंका असून यामध्ये मोठी रक्कम जमा आहे. या गावातील लोकांचा लंडनशी विशेष संबंध तर आहेच, पण त्यातील निम्म्याहून अधिक लोक लंडन आणि युरोपमध्ये राहतात.
advertisement
3/7
हे गाव इतकं समृद्ध गाव आहे की ते पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. हे गाव गुजरातमध्ये असून त्याचं नाव माधापर गाव आहे. तुम्ही ऐकलं नसेल की भारतातील काही गावातील लोकांनी परदेशात स्वतःचा क्लब बनवला आहे, परंतु या गावातील लोकांनी लंडनमध्ये स्वतःचा क्लब बनवला आहे, ज्याचे कार्यालय देखील आहे.
advertisement
4/7
1968 मध्येच लंडनमध्ये माधापर व्हिलेज असोसिएशन नावाची संघटना स्थापन झाली. ब्रिटनमध्ये राहणारे माधापर गावातील सर्व लोक कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांना भेटत राहावेत म्हणून त्यांचे कार्यालय उघडण्यात आले. त्याचप्रमाणे गावात एक कार्यालयही उघडण्यात आले जेणेकरून ते थेट लंडनशी जोडले जावे.
advertisement
5/7
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लोक या गावातून बाहेर गेले पण गाव कायमच अबाधित ठेवले. त्यांनी नेहमी गावाशी संपर्क ठेवला. माधापर गावातील लोक परदेशातून पैसे कमवून गावात जमा करतात. या गावातील प्रत्येक घरातील किमान 2 लोक परदेशात राहतात.
advertisement
6/7
गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील माधापर गावात प्ले स्कूलपासून इंटर कॉलेजपर्यंत हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी शाळा आहेत. गावाचा स्वतःचा शॉपिंग मॉल आहे, ज्यामध्ये जगभरातील मोठे ब्रँड आहेत.
advertisement
7/7
या गावातील लोक आजही शेती करतात. त्यांची शेतं कोणी विकली नाहीत. गावात एक अत्याधुनिक गोठाही आहे. गावात आधुनिक सुविधा असलेले आरोग्य केंद्र आहे. गावाला स्वतःचा कम्युनिटी हॉल आहे. गावातील पोस्ट ऑफिसमध्ये 200 कोटी रुपयांची मुदत ठेव आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Richest village in India : 7600 घरे, 17 बँका; भारतातील या श्रीमंत गावाविषयी माहितीय का? याच्यापुढे मुंबई-दिल्लीही फेल