'या' गावात 30 वर्षांनी जन्माला आलं माणसाचं बाळ, राहत होत्या सगळ्या मांजरीच
- Published by:Priya Lad
Last Updated:
Human Baby Born In Cats Village : या गावात माणसांपेक्षा जास्त मांजरी आहेत. गेल्या 30 वर्षांपासून तिथं एकही मूल जन्माला आलं नव्हतं, पण एका लहान मुलीच्या जन्माने गावात एक नवीन जीवन फुंकलं आहे.
advertisement
1/7

आपल्या आजूबाजूला कुत्रा, मांजरी असे प्राणी असतात. पण माणसांसमोर त्यांची संख्या कमीच. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल एक असं गाव जिथं माणसांपेक्षा मांजरांचीच संख्या जास्त आहे. जिथं पाहावं तिथं मांजरीच मांजरी दिसतील. मांजरांची संख्या इतकी या गावाला मांजरांचं गाव म्हणायला हरकत नाही. अशा या मांजरांच्या गावात आता माणसाचं बाळ जन्माला आलं आहे.
advertisement
2/7
इटलीतील पग्लियारा देई मार्सी, हा अब्रुझो प्रदेशातील एक अतिशय जुना आणि शांत ग्रामीण भाग आहे. कालांतराने लोक इथून मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले. वृद्ध लोकांची संख्या वाढली आणि तरुण पिढी जवळजवळ नाहीशी झाली. यामुळे तीन दशकांपर्यंत गावात एकही मूल जन्माला आलं नाही. परिस्थिती अशी बनली की गावात माणसांपेक्षा मांजरी जास्त होत्या.
advertisement
3/7
पण आता इथं इतक्या वर्षांनी एका मुलीचा जन्म झाला आहे, ज्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला आहे. गावात एका लहान मुलीच्या जन्माने एक नवीन जीवन फुंकलं आहे. या मुलीचं नाव लारा बुसी ट्राबुको आहे. गावातील सुमारे 20 रहिवाशांपैकी ती एक आहे. लाराच्या जन्माने गावात आनंद पसरला आहे.
advertisement
4/7
अलीकडेच तिच्या बाप्तिस्म्याला म्हणजे धर्मांतर समारंभाला आजूबाजूच्या परिसरातील लोकच नव्हे तर दूरदूरच्या पर्यटकांनाही गर्दी केली होती. लारामुळे अनेकांना पहिल्यांदाच गावाबद्दल ऐकायला मिळालं. लाराची आई चिन्झिया ट्राबुको म्हणते, "ज्यांना या गावाबद्दल आधी माहितीही नव्हती ते आता इथं येत आहेत. माझी मुलगी फक्त 9 महिन्यांची असताना प्रसिद्ध झाली आहे."
advertisement
5/7
लाराचा जन्म गावासाठी आनंदाचं कारण असला तरी तज्ज्ञ चिंतेत आहेत. ही समस्या या गावापुरती मर्यादित नाही, संपूर्ण इटलीमध्ये लोकसंख्येचं संकट वाढत चाललं आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2024 मध्ये इटलीमध्ये फक्त 3,69,944 मुलं जन्माला आली. जी आतापर्यंतची सर्वात कमी आहे.
advertisement
6/7
गेल्या 16 वर्षांपासून ही घसरण सुरू आहे. इटलीमध्ये सरासरी प्रजनन दर प्रति महिला 1.18 मुलांपर्यंत घसरला आहे, जो युरोपियन युनियनमधील सर्वात कमी मुलांपैकी एक आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की लोक आर्थिक अडचणी, नोकरीची अनिश्चितता आणि आरोग्याच्या चिंतांमुळे जाणूनबुजून मुलांना टाळत आहेत किंवा त्यांचं कुटुंब वाढवण्याचं टाळत आहेत.
advertisement
7/7
पग्लियारा देई मार्सीचे महापौर गिउसेप्पिना पेरोझी म्हणतात, "आमचं गाव वेगाने रिकामं होत आहे. वृद्धांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी नवीन पिढी नाही. लाराचा जन्म आमच्यासाठी आशेचा किरण आहे, पण आव्हानं अजूनही आहेत" (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
'या' गावात 30 वर्षांनी जन्माला आलं माणसाचं बाळ, राहत होत्या सगळ्या मांजरीच