Weird Law - विद्यार्थ्यांनी शाळेला 'इतके' दिवस दांडी मारली तर पालकांना जेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
इथल्या शाळेत विद्यार्थ्यांनी कारणाशिवाय सुट्टी घेतल्यास त्याची शिक्षा पालकांना होते.
advertisement
1/5

तुम्ही शाळेला कधी ना कधी दांडी मारली असेल. न सांगता सुट्टी घेतली की शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. तुमच्यासोबतही असं झालं असेल. पण असा देश जिथल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुट्टी घेतल्यास त्याची शिक्षा त्यांच्या पालकांना होते. तीसुद्धा साधीसुधी शिक्षा नाही तर पालकांना थेट जेलमध्येच पाठवलं जातं.
advertisement
2/5
सामान्यपणे जास्त सुट्ट्या घेतल्या की शिक्षक पालकांना बोलावून घेतात. सौदी अरेबियामध्ये मात्र पालकांना शिक्षाही दिली जाते. जर मुलांच्या सुट्टीचं कारण वैध नसेल तर पालकांना तुरुंगात टाकलं जातं.
advertisement
3/5
जर विद्यार्थ्याने 3 दिवसांची सुट्टी घेतली तर सुरुवातीला इशारा दिला जातो. त्यानंतरही विद्यार्थी शाळेत न गेल्यास आणि सलग 5 दिवस गैरहजर राहिल्यास दुसरा इशारा देण्यात येतो. याबाबत पालकांनाही माहिती दिली जाते.
advertisement
4/5
त्याचवेळी, 10 दिवस गैरहजर राहिल्यानंतर, तिसरा इशारा देतात आणि पालकांना शाळेत बोलावले जाते. 15 दिवस शाळेत न आल्यास शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्याची दुसऱ्या शाळेत बदली केली जाते.
advertisement
5/5
मात्र त्यानंतरही 20 दिवस कोणत्याही कारणाशिवाय विद्यार्थी शाळेत गेला नाही, तर शिक्षण विभाग त्याच्यावर बाल संरक्षण कायद्यातील तरतुदी लागू करतं. अशा परिस्थितीत शाळेत गैरहजर असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना तुरुंगातही पाठवलं जातं, असं वृत्त द गल्फ आणि मक्का न्यूजपेपरने दिलं आहे. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird Law - विद्यार्थ्यांनी शाळेला 'इतके' दिवस दांडी मारली तर पालकांना जेल