मॉलमधून व्हिटग्रास घेऊन गेली महिला, घरी येताच कुंडीतून येऊ लागला आवाज; डोकावून पाहिलं आणि धक्काच बसला
- Published by:Priya Lad
Last Updated:
Noise From Wheatgrass : एका महिलेने मॉलमधून व्हिटग्रासची कुंडी खरेदी केली. पण त्याच्यासोबत तिला आणखी काहीतरी फ्री मिळणार आहे. याची कल्पनाही तिने केली नव्हती.
advertisement
1/5

व्हिटग्रास ज्युससाठी फेमस आहे. लोक ते घरी पिकवतात आणि दररोज पितात. एका महिलेनेही व्हिटग्रासची कुंडी खरेदी केली. पण घरी येताच तिला कुंडीतून आवाज ऐकू आला. ती घाबरली. सुरुवातीला तिला वाटलं की वाऱ्याचा आवाज असेल, पण आवाज अधिकच वाढला.
advertisement
2/5
तिनं कुंडी उलटी करून पाहिली तेव्हा तिला खालून कुंडीला छिद्र दिसलं. त्यातून घरट्यासारखं काही दिसत होतं. तिने कुंडीतील व्हिटग्रास वर उचलला आणि तिला धक्काच बसला. पाहते तर काय आत चक्क उंदरांची फॅमिली होती.
advertisement
3/5
महिलेने मी काय करावं हे परत करावं का, असं व्हिडीओ पोस्ट करताना विचारलं. यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. काहींनी तुम्हाला पाळीव प्राणी मोफत मिळाले असं म्हटलं, तुम्हाला गव्हाच्या गवताच्या रसासोबत उंदरांचा रस मिळाला का? असं विचारलं.
advertisement
4/5
काहींनी या उंदरांना पाळण्याचा सल्ला दिला. त्यांना चिकू-मिकू नाव द्या, ते तुमचं नवीन कुटुंब आहे, घरात जागा बनवा असं म्हटलं. तर काहींनी त्यांना बाहेर सोडा, मॉलमध्ये तक्रार करा आणि पैसे परत मागा असा सल्ला दिला आहे.
advertisement
5/5
अशी घटना प्रत्यक्षात अनेक लोकांसोबत घडली आहे. मॉल किंवा नर्सरीमधून खरेदी केलेल्या वनस्पतींमध्ये अनेकदा कीटक, उंदीर किंवा इतर लहान प्राणी लपलेले असतात. विशेषतः उंदीर कुंड्यांच्या मातीत घर बनवतात. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
मॉलमधून व्हिटग्रास घेऊन गेली महिला, घरी येताच कुंडीतून येऊ लागला आवाज; डोकावून पाहिलं आणि धक्काच बसला