कुणी म्हणतं कौटिल्य, कुणी विष्णुगुप्त, पण आचार्य चाणक्य यांचं खरं नाव काय माहितीये?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti : आज चाणक्यनीती अनेक लोक फॉलो करतात. पण ही नीती सांगणारे आचार्य चाणक्य, कौटिल्य, विष्णुगुप्त नावाने ओळखले जातात. त्यांचं खरं नाव काय अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/7

आचार्य चाणक्य प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध राजनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी होते. त्यांच्या कित्येक वर्षांपूर्वी सांगितलेल्या नीती आजच्या काळातही उपयुक्त अशा आहेत. आज अनेकजण आपल्या जीवनात आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीती फॉलो करतात.
advertisement
2/7
आचार्य चाणक्य ज्यांना कुणी कौटिल्य म्हणतं, कुणी विष्णुगुप्त म्हणतं. पण त्यांची फक्त इतकीच नाही तर बरीच नावं आहेत.
advertisement
3/7
त्यांना वात्स्यायन, मल्लनाग, कौटिल्य, चाणक्य, द्रमिल, पक्षिल स्वामी, वराणक किंवा गुल असंही म्हटलं जायचं.
advertisement
4/7
कौटिल्य हे त्यांचं गोत्र, किंवा आडनाव होतं असं म्हटलं जातं, त्यावरून त्यांना कौटिल्य हे नाव पडल्याचं सांगतात.
advertisement
5/7
तर चाणक्य हे नाव त्यांना त्यांचे वडील चणक यांच्या नावावरून देण्यात आल्याचं सांगितलं जातं. काही जण तर त्यांच्या कुळाचंं नाव हे होतं असं म्हणतात. तर काहींच्या मते, त्यांचा जन्म पंजाबच्या चणक क्षेत्रात झाल्याने त्यांना हे नाव पडलं.
advertisement
6/7
विष्णुगुप्त हे त्यांचं खरं नाव होतं असं सांगितलं जातं. त्यांच्या पालकांनी त्यांच्या जन्मानंतर त्यांचं नाव विष्णुगुप्त ठेवल्याचं सांगितलं जातं.
advertisement
7/7
सूचना : हा लेख इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे. जी फक्त सर्वसामान्य माहितीसाठी देण्यात आलेली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कुणी म्हणतं कौटिल्य, कुणी विष्णुगुप्त, पण आचार्य चाणक्य यांचं खरं नाव काय माहितीये?