Meduvada Hole : मेदूवड्याच्या मधोमध होल का असतो? साऊथ इंडियन्सनाही माहिती नसेल या South Dishचं सीक्रेट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Why Hole In Meduvada Facts : मधोमध होल ही मेदूवड्याची ओळख. पण ही फक्त डिझाइन किंवा परंपरा नाही तर हा होल सायंटिफिक होल आहे. तो असण्यामागे वैज्ञानिक कारण आहे.
advertisement
1/7

गोलगोल, क्रिस्पी क्रिस्पी आणि गरमागरम मेदू वडा.... आहा... कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. एक साऊथ इंडियन डिश. ज्याची ओळख म्हणजे त्याच्या मधे असलेला हा होल. हा होलच मेदूवड्याला इतर वड्यांपेक्षा वेगळा बनवतो.
advertisement
2/7
मेदूवड्याच्या मधोमध हा होल का असतो? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? मेदूवड्यातील हा होल म्हणजे अनेकांना फक्त डिझाइन वाटत असेल पण हा होल खूप खास आहे. या साऊथ डिशचं सीक्रेट साऊथ इंडियन्सनाही माहिती नसावं.
advertisement
3/7
वड्याच्या मध्यभागी छिद्र असण्यामागे एक पारंपारिक कारण आहे. प्राचीन काळी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं सोपं व्हावं म्हणून दोरीवर बांधलेले वडे नेत असत. म्हणूनच वड्यांमध्ये छिद्रं पाडण्याची परंपरा सुरू झाली.
advertisement
4/7
पण मेदूवड्याच्या मध्यभागी असलेलं छिद्र ही केवळ एक परंपरा नाही तर हा एक सायंटिफिक होल आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही वड्याच्या मध्यभागी छिद्र फायदेशीर मानलं जातं.
advertisement
5/7
मेदूवडा उडीद डाळीच्या पिठापासून बनवला जातो. जो खूप जाड असतो. जर मध्यभागी छिद्र नसेल तर वडा आतून नीट शिजणार नाही. वड्याच्या मध्यभागी असलेल्या छिद्रामुळे त्याचं पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते, म्हणजेच त्याचा जास्त भाग तेलाच्या संपर्कात येतो. तळताना तेल त्या छिद्रातून आत जातं ही रचना तळताना वडा फुटण्यापासून रोखते आणि समान रितीने शिजतं.
advertisement
6/7
यामुळे वडा आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत होतो, ज्यामुळे त्याची चव आणखी वाढते. म्हणूनच मेदू वडा इतका चविष्ट आणि स्वादिष्ट लागतो.
advertisement
7/7
हा होल वडा अधिक समान रितीने शिजण्यास, कमी तेल शोषण्यास आणि कुरकुरीत होण्यास मदत करतो. ज्यामुळे त्याची चव वाढते. छिद्राशिवाय मेदूवडा तळण्यास जास्त वेळ लागतो आणि जास्त तेल शोषलं जातं, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Meduvada Hole : मेदूवड्याच्या मधोमध होल का असतो? साऊथ इंडियन्सनाही माहिती नसेल या South Dishचं सीक्रेट