Plane Facts : प्लेनचे पायलट कधीच मारत नाहीत परफ्युम? काय आहे कारण?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Plane Secret : पायलट आणि विमानातील इतर कर्मचाऱ्यांना परफ्यूम, डिओडरंट, वापर करण्यास बंदी आहे. 99% लोकांना याबाबत माहिती नाही.
advertisement
1/7

कॉलेजला जाणं असो, जॉबला जाणं असो वा कुठे फिरायला... घामाची दुर्गंधी येऊ नये, फ्रेश वाटावं म्हणून आपण परफ्युम मारतो. पण तुम्हाला माहिती आहे का विमानातील पायट्स जे अगदी टापटिप राहतात ते मात्र परफ्युम कधीच मारत नाहीत.
advertisement
2/7
बहुतेक लोकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, पायलट कितीही चांगले दिसत असले तरी त्यांना परफ्यूम लावता येत नाही. केवळ पायलटच नाही, तर विमानाच्या इतर कर्मचाऱ्यांनाही परफ्यूम लावण्याची परवानगी नसते. पण असं का? परफ्यूम किंवा सुगंध केवळ एकाच कारणामुळे नव्हे, तर अनेक कारणांमुळे वापरता येत नाहीत.
advertisement
3/7
ज्वलनशील : परफ्यूममध्ये अल्कोहोल असते. त्यामुळे परफ्यूम एक ज्वलनशील पदार्थ आहे. यामुळे त्याला खूप लवकर आग लागू शकते आणि धोक्याची शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणूनच पायलट आणि कर्मचाऱ्यांना विमानात परफ्यूम आणि डिओडोरंट वापरण्यास मनाई आहे. पण यामागे केवळ हे एकच कारण नाही, आणखीही कारणे आहेत.
advertisement
4/7
तीव्र वास : अनेक परफ्यूमचा वास तीव्र असतो. यामुळे पायलटचे लक्ष विचलित होऊ शकते. तीव्र वासामुळे पायलटला श्वास घेण्यासही अडचण येऊ शकते. हे देखील एक कारण आहे की पायलट आणि क्रू मेंबर्सना विमानात परफ्यूम लावण्याची परवानगी नसते.
advertisement
5/7
ब्रेथ ॲनालाइझर चाचणी : काही परफ्यूममध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जर एखाद्या पायलट किंवा क्रू मेंबरने परफ्यूम वापरला, तर त्यांना ब्रेथ ॲनालाइझर चाचणीत सकारात्मक (positive) निकाल येऊ शकतो. योगायोगाने, विमानात चढण्यापूर्वी पायलट आणि क्रू मेंबर्सची ब्रेथ ॲनालाइझर चाचणी केली जाते, ज्याला ब्रेथ टेस्ट किंवा अल्कोहोल टेस्ट असेही म्हणतात. ही चाचणी एका विशिष्ट उपकरणाने केली जाते, जे व्यक्तीच्या श्वासातील अल्कोहोलचे प्रमाण मोजते.
advertisement
6/7
ॲलर्जी : काही लोकांना परफ्यूमची ॲलर्जी असते. अशा परिस्थितीत, जर पायलट आणि क्रू मेंबर्सनी विमानात परफ्यूम वापरला, तर प्रवाशांना गैरसोय होऊ शकते. त्यांना शिंका येणे, खोकला येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
7/7
सुगंधित पदार्थ : पायलट आणि क्रू मेंबर्सना उड्डाण करण्यापूर्वी माउथवॉश, टूथपेस्ट आणि इतर सुगंधित पदार्थ वापरण्यासही मनाई आहे, कारण या सर्व वस्तूंमध्ये अल्कोहोल असते, ज्यामुळे ब्रेथलायझर चाचणीत सकारात्मक निकाल येऊ शकतो.