Interesting Facts : Wi-Fi आणि Mobile Data दोन्ही ऑन असतील तर फोन नेमकं कोणतं इंटरनेट वापरतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Internet Facts : Wi-Fi आणि Mobile Data दोन्ही एकाच वेळी चालू असतील तर फोन नेमकं कोणतं इंटरनेट वापरतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
1/7

जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये Wi-Fi आणि Mobile Data दोन्ही कायम ON असतात. घरी, ऑफिसमध्ये किंवा कॅफेमध्ये Wi-Fi वापरतो, तर बाहेर असताना Mobile Data. पण अनेकदा एक प्रश्न पडतो, दोन्ही एकाच वेळी चालू असतील तर फोन नेमकं कोणतं इंटरनेट वापरतो? आणि Wi-Fi असूनही Mobile Data कसा खर्च होतो?
advertisement
2/7
फोन नेहमी Wi-Fi ला प्राधान्य देतो. म्हणजे वायफाय ऑन आहे आणि फोन वायफाय नेटवर्कला कनेक्ट आहे, वायफायवर इंटरनेट व्यवस्थिती चालू आहे. अशा परिस्थितीत फोन मोबाईल डेटा वापरत नाही. सगळं ब्राऊझिंग, व्हिडीओ, एप वापर हे वायफायवरूनच होतं.
advertisement
3/7
अनेकदा असं होतं की फोन वायफायला कनेक्टेड दिसतो पण इंटरनेट नीट चालत नाही, स्लो चालतं अशावेळी काही स्मार्टफोन आपोआप मोबाईल डेटा वापरायला सुरुवात करतात. यासाठी फोनमध्ये खास फिचर असतं. अँड्रॉईडमध्ये स्मार्ट नेटवर्क स्विच किंवा एडप्टिव्ह कनेक्टिव्हिटी तर आयफोनमध्ये वायफाय असिस्ट ही सेटिंग ऑन असेल तर वायफाय सिग्नल विक झाला, स्पीड कमी झाली, व्हिडीओ बफर होऊ लागला, की फोन आपोआप मोबाईल डेटावर स्विच होतो.
advertisement
4/7
काही वेळा एप अपडेट्स, क्लाऊड बॅकअप, लोकेशन सर्व्हिस, एमेल सिंक हे सगळं वायफाय असतानाही मोबाईल डेटा वापरू शकतं. विशेषतः वायफाय अस्थिर किंवा स्लीप मोडमध्ये असेल तर.
advertisement
5/7
वायफाय आणि मोबाईल डेटा दोन्ही एकाच वेळी वापरले जात नाही. वायफाय किंवा मोबाईल डेटा यापैकी एकाच नेटवर्कवरून डेटा पाठवतो. नेटवर्क बदलताना काही क्षणांसाठी स्विच होतो पण डेटा एकाच वेळी दोन्हीवर विभागला जात नाही.
advertisement
6/7
आता मोबाईल नेमकं कोणतं इंटरनेट वापरतं आहे हे कसं ओळखायचं? अँड्रॉईड फोनमध्ये वायफाय चिन्हाजवळ अपडाऊन बाण दिसत असतील तर वायफाय डेटा वापरला जा, आहे आणि LTE, 4G किंवा 5G चिन्ह दिसत असेल तर मोबाईल डेटा वापरला जातोय. आयफोनमध्ये वायफाय आयकॉन दिसतो तर LTE / 4G / 5G दिसलं तर मोबाईल डेटा वापरला जातोय.
advertisement
7/7
एकंदर काय तर वायफाय आणि मोबाईल डेटा दोन्ही ऑन असतील तर फोन आधी वायफाय वापरतो. वायफाय स्लो, बंद किंवा अनस्टेबल असेल तर मोबाईल डेटा वापरला जातो. स्मार्ट स्विचिंग ऑन असल्यास डेटा नकळत खर्च होऊ शकतो. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Interesting Facts : Wi-Fi आणि Mobile Data दोन्ही ऑन असतील तर फोन नेमकं कोणतं इंटरनेट वापरतो?