China Woman Pregnancy Age : चीनी महिला कोणत्या वयात मुलांना जन्म देतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
मुलांना जन्म कोणत्या वयात द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. भारतात तसं वयाच्या 18 व्या वर्षी आणि करिअरला प्राधान्य देणाऱ्या जास्त वयात प्रेग्नन्सीचा निर्णय घेतात. पण चीनमध्ये महिला कोणत्या वयात मुलांना जन्म देतात हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/7

मुलगी वयात आली आणि तिने शारीरिक संबंध ठेवलं की प्रेग्नन्सीची शक्यता असते. पण प्रेग्नन्सीचं एक विशिष्ट वय असतं. त्या वयात प्रेग्नंट होणं मूल आणि आई दोघांच्याही आरोग्यासाठी चांगलं असतं.
advertisement
2/7
अमेरिकन काँग्रेस फॉर ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनॅकॉलॉजिस्ट (ACOG) च्या मते, 18 ते 30 वयोगटातील महिलांची प्रजनन क्षमता सर्वाधिक असते. वयाच्या 30 नंतर प्रजनन क्षमता कमी होऊ लागते.
advertisement
3/7
वयाच्या 40 नंतर गर्भधारणेची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते. रजोनिवृत्तीचे वय सुमारे 50 वर्षे आहे आणि स्त्रिया रजोनिवृत्तीपूर्वीच गर्भवती होऊ शकतात.
advertisement
4/7
एकेकाळी चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होता. पण आता चीनमधील लोकसंख्या झपाट्याने घटते आहे. तीन लोकसंख्येच्या बाबतीत आता दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
advertisement
5/7
सर्वाधिक लोकसंख्येमुळे चीनमध्ये वन चाइल्ड पॉलिसी लागू करण्यात आली होती. कपलला फक्त एकच मूल जन्माला घालण्याची ही योजना होती.
advertisement
6/7
पण आता चीनने ही योजना बंद केली आहे. चीनमध्ये सरकार लग्न आणि मुलांच्या जन्मासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहे.
advertisement
7/7
सामान्यपणे चीनमध्ये महिला 25 ते 30 वयोगटात प्रेग्नन्सीचा विचार करतात. या वयात त्या मुलांना जन्म देतात. पण गेल्या काही वर्षांत चीनी सरकार जबरदस्ती लवकर म्हणजे यापेक्षा कमी वयात मूल जन्माला घालायला लावत आहे. चीनमधील तरुणांची घटती संख्या यासाठी कारणीभूत आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक - AI)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
China Woman Pregnancy Age : चीनी महिला कोणत्या वयात मुलांना जन्म देतात?