TRENDING:

Whisky Fact : जगातील सर्वात महागडी व्हिस्की कोणती? एका बाटलीची किंमत 230 कोटी! यादीतील इतर नावं आणि किंमती आश्चर्यचकीत करतील

Last Updated:
आज आम्ही अशा व्हिस्कीबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत हजारो किंवा लाखोमध्ये नाही तर कोट्यवधींमध्ये आहे. मद्यप्रेमींना तर या दारुबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली असेल. ती इतकी महाग का? त्याचं नाव काय? ती दारु कुठे मिळते? वैगरे वैगरे....
advertisement
1/11
जगातील सर्वात महागडी व्हिस्की कोणती? यादीतील नावं आणि किंमती आश्चर्यचकीत करतील
लोक पार्टीला गेला ती आपल्या आवडीची दारु पितात. काही लोक आपल्या बजेटमध्ये दारु विकत घेतात तर काही लोक बजेटचा विचार न करता आपल्याला जी प्यायला आवडेल अशी दारु ऑर्डर करतात. तर या सगळ्यात असा एक वर्ग आहे, जो आपल्या मित्रांना दाखवायला किंवा स्टेटस सिंबल सिद्ध करण्यासाठी महागडी व्हिस्की पितात. पण महाग म्हणजे अशी कितीशी महाग दारु तुम्ही प्यायली किंवा बघितली असाल?
advertisement
2/11
कारण आज आम्ही अशा व्हिस्कीबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत हजारो किंवा लाखोमध्ये नाही तर कोट्यवधींमध्ये आहे. मद्यप्रेमींना तर या दारुबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली असेल. ती इतकी महाग का? त्याचं नाव काय? ती दारु कुठे मिळते? वैगरे वैगरे....
advertisement
3/11
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण व्हिस्कीच्या दुनियेत काही बाटल्या आता फक्त 'पेय' राहिलेल्या नाहीत, तर त्या दुर्मीळ कलाकृती बनल्या आहेत. या बाटल्या बार काउंटरवर नव्हे, तर खासगी गॅलरी, नियंत्रित तापमान असलेल्या तळघरांमध्ये आणि उच्च सुरक्षा असलेल्या लिलाव कक्षांमध्ये फिरत असतात. चला, पाहूया व्हिस्कीच्या या 'गिल्डेड हायरार्की'मधील सर्वात महागड्या आणि रहस्यमय बाटल्या कोणत्या आहेत आणि त्यांची किंमत इतकी जबरदस्त का आहे.
advertisement
4/11
सर्वात महागड्या व्हिस्कीच्या यादीत अव्वल स्थानी आहे इसाबेलाज आयले (Isabella's Islay). तिची अंदाजित किंमत जवळपास ₹46 कोटी आहे. ही बाटली एखाद्या उच्च दर्जाच्या डिझाईनर गोष्टीपेक्षा कमी नाही. या बाटलीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर 8,500 हून अधिक हिरे आणि 300 माणके (Rubies) जडवलेले आहेत. ही बाटली पूर्णपणे पांढऱ्या सोन्यात (White Gold) सेट केलेली आहे. यात असलेली व्हिस्की जितकी मौल्यवान आहे, तितकेच या बाटलीवरील रत्नांचे आणि कलाकुसरीचे काम तिच्या किमतीत भर घालते.
advertisement
5/11
पण इथे 'इसाबेलाज आयले' आपल्या चमकने जगाचं लक्ष वेधून घेते, तर मॅकलान 1926 (Macallan 1926) आपली दुर्मीळता आणि दंतकथांमुळे रहस्यमय वाटते.
advertisement
6/11
मॅकलान 1926च्या वालेरिओ अदामी एडिशन (Valerio Adami Edition) ची किंमत तब्बल ₹230 कोटींपर्यंत गेली आहे. याच्या फक्त 40 बाटल्या तयार करण्यात आल्या होत्या आणि त्याचे लेबल सुप्रसिद्ध इटालियन पॉप आर्टिस्टने डिझाईन केले होते. याच बॅचमधील एका बाटलीवर आयरिश कलाकाराने हाताने चित्रकला (Hand-painted) केली होती. ती यूकेच्या लिलावात अंदाजे ₹120 कोटींना विकली गेली.
advertisement
7/11
या बॅचमधील 'मॅकलान फाईन ॲन्ड रेअर 1926' (Macallan Fine and Rare 1926) ची किंमतही जवळपास ₹16 कोटी आहे. व्हिस्की संग्राहक याला जुन्या व्हिस्की मोजण्याचा 'गोल्ड स्टँडर्ड' मानतात.
advertisement
8/11
यामाझाकी 55 वर्षांची (Yamazaki 55-Year-Old)स्कॉटलंडच्या बाहेर, जपानने या अति-विशेष क्लबमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. यामाझाकी 55 वर्षांची ही आशियातील सर्वात मौल्यवान व्हिस्की आहे. याची किंमत जवळपास ₹7 कोटी आहे. ही व्हिस्की Mizunara आणि अमेरिकन ओक दोन्ही प्रकारच्या बॅरल्समध्ये जुनी झाली आहे, जी जपानी कारागिरीची 50 वर्षांची मेहनत दर्शवते.
advertisement
9/11
डालमोर 62 वर्षांची (Dalmore 62-Year-Old): ही बाटली लिलावात ₹2 कोटी ते ₹3 कोटी मध्ये विक्री होते. कमी उत्पादनामुळे तिचे प्रत्येक दर्शन खास असते.
advertisement
10/11
मॅकलान लालीक लेगसी कलेक्शन: ही सहा बाटल्यांची खास कलेक्शन असून, त्याची किंमत ₹5 कोटींहून अधिक आहे. यात फ्रेंच काचकाम आणि मॅकलान व्हिस्की यांचा संगम आहे.
advertisement
11/11
मॅकलान रेड कलेक्शन 60 वर्षांची : आधुनिक अल्ट्रा-प्रीमियम लाइनअपमधील या व्हिस्कीची किंमत जवळपास ₹6 कोटी आहे. थोडक्यात, या व्हिस्कीच्या बाटल्या केवळ पेय नसून, त्या कला, इतिहास आणि प्रचंड श्रीमंतीचे प्रतीक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Whisky Fact : जगातील सर्वात महागडी व्हिस्की कोणती? एका बाटलीची किंमत 230 कोटी! यादीतील इतर नावं आणि किंमती आश्चर्यचकीत करतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल