TRENDING:

Worlds Shortest Flight Journey : मॅगी शिजायला ठेवायची आणि जाऊन यायचं! जगातील सगळ्यात फास्ट विमान प्रवास, तिकीट किती?

Last Updated:
Worlds Shortest Flight Journey : विमान प्रवासाला किती वेळ लागतो असं विचारलं तर... काही मिनिटं, तास. पण अवघ्या काही सेकंदात तुमचा विमान प्रवास पूर्ण होईल असं सांगितलं तर...
advertisement
1/9
मॅगी शिजायला ठेवायची आणि जाऊन यायचं! जगात सर्वात फास्ट विमान प्रवास, तिकीट किती?
विमानाने प्रवास करताना तुम्ही किती वेळात पोहोचाल असं विचारलं तर.... काही तास तर जातीलच, असंच सगळे सांगतील. पण अवघ्या फक्त काही सेकंदात तुमचा विमान प्रवास पूर्ण होत असेल असं सांगितलं तर... साहजिकच आश्चर्य वाटेल.
advertisement
2/9
जगातील सर्वात कमी वेळेचा विमान प्रवास, जो इतका कमी आहे की मॅगी शिजायला टाकायची आणि विमानाने जाऊन परत यायचं. मॅगी शिजायला 2 मिनिटं लागतात. या विमान प्रवासाच्या तुलनेत मॅगी शिजण्याचीही वेळही जास्त वाटले कारण हा विमान प्रवास फक्त 53 सेकंदाचा आहे.
advertisement
3/9
जगातील सगळ्यात कमी वेळेचा विमान प्रवास विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही सेकंदातच ते लँड होतं. जगातील सर्वात लहान व्यावसायिक उड्डाण म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद आहे.
advertisement
4/9
या प्रवासाचं अंतर फक्त 2.7 किलोमीटर आहे आणि विमानाला ते पूर्ण करण्यासाठी फक्त 2 मिनिटं लागतात.  वाऱ्याची दिशा अनुकूल असल्यास हा वेळ 53 सेकंदांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
advertisement
5/9
तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या कमी अंतरासाठी विमानाचा वापर का केला जातो? खरंतर हा विमान प्रवास आहे तो दोन बेटांमध्ये. जिथं रस्ता किंवा पूल नाही आणि समुद्रही असा आहे की बोटीने प्रवास करणं कठीण होऊ शकते. म्हणूनच ही हवाई सेवा स्थानिक लोकांसाठी आणि अत्यावश्यक सेवांसाठी लाइफलाइन आहे.
advertisement
6/9
या प्रवासासाठी एक लहान ब्रिटन-नॉर्मन BN2B-26 आयलंडर विमान वापरलं जातं. ज्यामध्ये सुमारे 8-10 प्रवासी बसू शकतात. प्रवासी त्यात बसून पायलटला विमान उडवताना पाहू शकतात, ज्यामुळे हा अनुभव आणखी खास बनतो.
advertisement
7/9
हे अनोखे विमान केवळ स्थानिकांनाच सुविधा देत नाही तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते जे या आश्चर्यकारक आणि सर्वात लहान हवाई प्रवासाचा अनुभव घेऊ इच्छितात. आता हे ठिकाण आहे कुठे तर स्कॉटलंडच्या ऑर्कने बेटांवर असलेल्या वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे बेटांदरम्यान हे उड्डाण आहे.
advertisement
8/9
या दोन्ही बेटांमधील हवाई प्रवास 1967 मध्ये सुरू झाला. स्टुअर्ट लिंकलेटर नावाच्या पायलटने या मार्गाने सर्वात जास्त 12000 वेळा उड्डाण केलं आहे.
advertisement
9/9
आता या प्रवासाचं तिकीट किती आहे? तर प्रत्येक प्रवाशासाठी 14 पाऊंड म्हणजे जवळपास 1800 रुपये. स्कॉटलंडच्या मानकांनुसार हे तिकीट खूप स्वस्त मानलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Worlds Shortest Flight Journey : मॅगी शिजायला ठेवायची आणि जाऊन यायचं! जगातील सगळ्यात फास्ट विमान प्रवास, तिकीट किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल