सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात राज्यासह सोलापूर जिल्ह्यातही भाजप महायुतीला घवघवीत यश मिळालंय. सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यात महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांची खऱ्या अर्थाने लढत होती. भाजपाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख 77 हजार पेक्षा अधिक मताधिक्याने विजय झाली आहेत. सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आहे.
advertisement
सोलापूर दक्षिण मतदार संघात भाजप नेते आणि माजी मंत्री राहिलेल्या सुभाष देशमुख यांनी या मतदारसंघातून 75 हजारापेक्षा अधिक मताधिक्याने ते विजय होत आपली आमदारकी तिसऱ्यांदा कायम केली आहे. दरम्यान, गत निवडणुकीत येथील मतदारसंघात भाजप नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनाच भाजपने उमेदवारी दिली होती तर शिवसेना ठाकरे गटाने अमर पाटील या नवख्या उमेदवाराला मैदानात उतरवले होते.
विधानसभा निवडणूक निकालाबाबत सर्वसामान्याच्या मनात काय?, लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
तर, काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या धर्मराज काडादी यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष अर्ज दाखल केला होता. तर दिलीप माने यांनी सुद्धा बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण शेवटच्या वेळी दिलीप माने यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. तर एन मतदानाच्या वेळी काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांना पाठिंबा न देता अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे येथील महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसून आलं.
लाडक्या बहिणींनी स्वतःमध्ये परिवर्तन न करता महायुती सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्याने महायुती सरकारला आशीर्वाद मिळाला आहे,असं म्हणतं मतदार संघातील सर्व मतदारांचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी मनापासून आभार मानले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वांन अनेक गदारोळामध्ये सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवून तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा मनापासून आभार मानले आहेत. कोणावरही टीका टिपणी न करता विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनीही निवडणूक लढवली आहे.
मधल्या काळात अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले माझ्यावर झाले, तरीसुद्धा माझी कोणतीही तक्रार नाही आणि भविष्यात सुद्धा तक्रार न करता मतदार संघात काम चांगलं करावं वाटतं. येणाऱ्या काळात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास आणि काया पलट निश्चित करणार आहे, असा विश्वास विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.





