पंतप्रधान मोदी यांची छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील 14 मतदारसंघांसाठी चिकलठाणा एमआयडीतील ग्रॅहम फर्थ कंपनीच्या मैदानावर सभा होत आहे. त्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जालना रोडवरील केंब्रिज चौक ते वसंतराव नाईक चौक यादरम्यानचा रस्ता दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. सभेसाठी 60 हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात येत आहे. सभेच्या परिसरातील मधमाशांचे मोहोळ हटवण्याच्या सूचना केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्या आहेत.
advertisement
यंदा महाराष्ट्रात कुणाचं सरकार? जनता एकालाही देणार नाही बहुमत, राजकीय विश्लेषक असं का म्हणाले?
हा मार्ग राहणार बंद
केंब्रिज चौक ते वसंतराव नाईक (सिडको) चौक नाका हे मार्ग पूर्णपणे वाहतूक बंद राहणार आहेत. यासाठी पर्यायी मार्ग : सिडकोतील वसंतराव नाईक चौकातून एन-1 चौक- वोक्हार्ट टी, लहुजी साळवे चौक, नारेगाव-नारेगाव टी- सावंगी बायपास रोड-केंब्रिज नाका- झाल्टा फाटा बीड बायपासमार्गे वाहने ये-जा करतील.
इथं नो पार्किंग!
केंब्रिज चौक ते सभास्थळ 'नो पार्किंग' जालना रोडवर सभास्थळापासून विमानळापर्यंत दोन्ही बाजूंचे रस्ते सुमारे साडेतीन तास बंद असतील. केंब्रिज चौक ते सभा स्थळ हा परिसर 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित केला आहे, अशी माहिती पोलिसनी दिली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील 14 मतदारसंघांसाठी चिकलठाणा परिसरात सभेचं आयोजन केलं आहे. यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनिमित्त मोदी आले होते. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून मोदी तिसऱ्यांदा शहरात येत आहेत. त्यामुळे सभेला गर्दी होण्याची शक्यता असून 15 एकर क्षेत्रात 75 हजार कार्यकर्त्यांसाठी बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सभेसाठी अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.






