TRENDING:

Thackeray Vs Rane : 'सामना'च्या फ्रंटपेजवर राणे झळकले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Last Updated:

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंविरुद्ध राणे हे परंपरेने चर्चेचे वादग्रस्त केंद्र राहिले आहे. अधिवेशनाच्या सत्रात हीच जुनी सत्तासंघर्षाची मालिका पुन्हा रंगताना दिसत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंविरुद्ध राणे हे परंपरेने चर्चेचे वादग्रस्त केंद्र राहिले आहे. अधिवेशनाच्या सत्रात हीच जुनी सत्तासंघर्षाची मालिका पुन्हा रंगताना दिसत आहे. विधानभवनात एकीकडे मंत्री नितेश राणे शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावर जोरदार टीका करत आहेत, तर दुसरीकडे 'सामना' या ठाकरे गटाच्या मुखपत्रामध्ये नितेश राणे यांची जाहिरात थेट फ्रंट पेजवर झळकताना दिसली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना नव्याने पेट दिला आहे.
'सामना'च्या फ्रंटपेजवर राणे झळकले, राजकीय चर्चांना उधाण, पडद्यामागे हालचाली काय?
'सामना'च्या फ्रंटपेजवर राणे झळकले, राजकीय चर्चांना उधाण, पडद्यामागे हालचाली काय?
advertisement

राजकीय वैर, आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे विरोधी विचारसरणी असलेल्या नेत्याच्या जाहिरातीला ठाकरेंच्या मुखपत्रात मानाचे स्थान दिले जाणे, हे अनेकांना धक्कादायक वाटले. एकीकडे नितेश राणे दररोज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीकेचा बाण सोडत आहेत. दुसरीकडे, त्यांच्या सरकारी उपक्रमाची जाहिरात सामनाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध होते, हे अनेकांच्या मते राजकीय आणि व्यावसायिक आचारधर्मातील सीमारेषा अस्पष्ट करत आहे.

advertisement

'सामना'च्या फ्रंटपेजवर  नितेश राणे यांची जाहिरात पूर्णपणे व्यावसायिक स्तरावर दिली गेली आहे. राणे यांची जाहिरात ही राज्य शासनाच्यावतीने देण्यात आली आहे. मात्र, राणेंसोबत राजकीय हाडवैर असतानाही सामनाने ही जाहीरात स्वीकारल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दर अधिवेशनात राणे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगतोच, पण यावेळी या सामन्याला सामनामधील राणेंच्या फ्रंट पेज जाहिरातीतून वेगळे वळण मिळाले आहे.  राजकीय मतभेद असले तरीही माध्यमांच्या जाहिरात धोरणात राजकारणाचा प्रभाव असावा का? हि जाहिरात देऊन ठाकरे नेमक काय साध्य करू पाहत आहे. एकीकडे कठोर टिका करायची आणि दुसरीकडे जाहिरात मिळवण्यासाठी रेड कार्पेट टाकायच हे नेमके काय ?  असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

advertisement

यासंदर्भात शिवसेना (ठाकरे गट) व मंत्री नितेश राणे यांच्याकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेले नाही. मात्र, या घटनेनंतर आता मंत्री नितेश राणे आणि ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा.

मराठी बातम्या/Politics/
Thackeray Vs Rane : 'सामना'च्या फ्रंटपेजवर राणे झळकले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल