गर्भवती महिलांसाठी अधिक धोकादायक
जर गर्भवती महिला झिका विषाणूच्या बळी ठरल्या तर गर्भामध्ये मायक्रोसेफली होऊ शकतं. ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये मेंदूच्या असामान्य विकासामुळे बाळाचं डोकं खूपच लहान होतं.
पुण्यातील झिका विषाणू संसर्गाचा पहिला रुग्ण एरंडवणे परिसरातच आढळून आला आहे. 46 वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांनंतर त्यांच्या 15 वर्षांच्या मुलीचा नमुनाही पॉझिटिव्ह आढळला. याशिवाय मुंढवा परिसरात दोन बाधित लोक आढळले असून त्यापैकी एक 47 वर्षीय महिला आणि दुसरा 22 वर्षीय पुरुष आहे.
advertisement
पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सर्व रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून संक्रमित डासांना रोखण्यासाठी फॉगिंग आणि फ्युमिगेशन यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. झिका विषाणू संक्रमित एडिज डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. हा डास डेंग्यू आणि चिकुनगुनिया सारख्या विषाणूंचा प्रसार करण्यासाठी देखील ओळखला जातो. 1947 मध्ये युगांडामध्ये हा विषाणू पहिल्यांदा ओळखला गेला.