पुणे : अहिल्या सेलच्या माध्यमातून गुन्ह्याला बळी पडलेल्या पीडित महिला, मुलं आणि जेष्ठ नागरिकांना आता विनामूल्य न्याय हा मिळणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण माध्यमातून अहिल्या सेल उपक्रमाला सुरुवात झाली असून शहरातील 95 पोलीस ठाण्यांमध्ये अहिल्या सेल सुरू करण्यात आला आहे. गुन्ह्याला बळी पडलेल्या महिला आणि मुलांना कायदेशीर मदत करण्यासाठी या उपक्रमाचा एक भाग म्हणून, 150 प्रशिक्षित महिला वकिलांची नियुक्ती प्रो-बोनो आधारावर करण्यात आली आहे.
advertisement
प्रक्रियात्मक मंजुरी जलद करणे, FIR ची त्वरित नोंदणी सुनिश्चित करणे, वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मदत करणे, पीडितांना समुपदेशकांकडे पाठवून त्यांना मनोधैर्य आणि पीडित नुकसान भरपाई योजनांसारख्या सरकारी योजनांबद्दल माहिती देऊन संकटात असलेल्या महिला आणि मुलांना मोफत कायदेशीर सल्ला हा दिला जाणार आहे.
सेंद्रिय शेतीनं शेतकऱ्याचं नशीब उजाळलं, वर्षाला खर्च 25 हजार अन् कमाई लाखात, कसा केला प्रयोग यशस्वी?
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून घेतलेला या निर्णयामुळे पीडितांना सशक्त करण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान गंभीर स्वरूपातील गुन्हे ज्यामध्ये पुरावे सिद्ध झाले आहेत, तसेच खून आणि बाल लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यातील आरोपींना याचा लाभ घेता येणार नाही.
अहिल्या सेलमध्ये 150 महिला वकील या प्रो-बोनो च्या माध्यमातून सेवा देणार आहेत. यासाठी कुठलीही फी न घेता मोफतमध्ये त्यांना ही मदत केली जाणार आहे. पुणे जिल्ह्या अंतर्गत येणारे 95 पोलीस स्टेशनमध्ये काम हे करणार आहेत. कुठल्याही गुन्ह्यामध्ये व्हिक्टिम टीम त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या लवकर वेळेवर फाईल करून घेतल्या जात नाही. तसेच काही लोकांना समुपदेशनाची गरज असेल त्यांना मदत करणे अशा सेवा या देण्यात येणार आहे. यामध्ये महिला मुलं आणि वयोवृद्ध यांना मदत केली जाणार आहे, अशी माहिती सोनल पाटील यांनी दिली आहे.
अहिल्या सेल ही मागील वर्षी 8 मार्च 2024 ला सुरुवात करण्यात आली होती. परंतु ती प्रायोगिक तत्त्वावर होती. मात्र आता ती पूर्ण वेळ काम करणार असून सामान्य नागरिक आणि व्हिक्टिम टीमला मदत करणार आहे. यामध्ये सगळ्या प्रकारच्या गुन्हे सोडवण्यासाठी मदत करणार आहे, असं वकील माधवी पोतदार यांनी सांगितलं.