दादांनी नागरिकांपुढे हात जोडले
अजित पवार पुण्यातील आहिरेगावात विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पहाटे पहाटे पोहोचले होते. त्यावेळी दादांसमोर कामाचा तक्रारीची सरबत्ती लावली. त्यावेळी आढावा घेताना दादांनी नागरिकांपुढे हात जोडल्याचं पहायला मिळालं. आहिरेगावात असलेल्या मंदिरात असलेले पुजारी आणि स्थानिक नागरिक मंदिरात अजित पवार यांना मंदिरात येण्यासाठी हट्ट करत होते. त्यावेळी अजित पवार काहीसे संतापल्याचं पहायला मिळालं.
advertisement
एक तर मला देव देव करायला...
अजित पवार आहिरेगावातील नागरिकांसमोर हात जोडून म्हणाले, मी पहाटे पाच वाजता उठतो, एक तर मला देव देव करायला लावा किंवा विकास करायला सांगा. एवढं बोलल्यानंतर अजित पवार निघून गेले. त्यावेळी रुपाली चाकणकर देखील तिथं उपस्थित असल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा Video
नांदेड सिटी परिसरात पाहणी
अजित पवार यांच्याकडून धायरी आणि नांदेड सिटी परिसरात देखील पाहणी झाली. वारजे - शिवणे पुलाच्या कामाचा अजित पवार यांनी आढावा घेतला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर पुण्यातील हा शिवने पूल सगळ्यात आधी पाण्याखाली जातो. याच शिवणे पुलाची उंची वाढवण्यासाठी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.