TRENDING:

लग्नाला फक्त 6 महिने, पत्नीसह सासूने छळ छळ छळलं, पुण्यात तरुणाने संपवलं जीवन

Last Updated:

पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पत्नी आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

अक्षय विजय साळवे असं आत्महत्या करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पुण्याच्या येरवडा परिसरातील गणेशनगर येथील रहिवासी होता. या प्रकरणी त्याची पत्नी दीपाली अक्षय साळवे आणि सासू संगीता अशोक अडागळे यांच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मृत अक्षयची आई लक्ष्मी विजय साळवे (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि दीपाली यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर दीपाली आणि तिची आई संगीता यांनी अक्षयकडे वारंवार आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा आग्रह धरला. यासाठी त्यांनी अक्षयवर सतत दबाव आणला. याच कारणावरून दीपालीने अक्षय विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल केल्या होत्या.

advertisement

पत्नी आणि सासूच्या या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अक्षयने अखेर आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. आपल्या मुलाने पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे अक्षयच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. दळवी करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
लग्नाला फक्त 6 महिने, पत्नीसह सासूने छळ छळ छळलं, पुण्यात तरुणाने संपवलं जीवन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल