या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह एकूण आठ जणांना अटक केली आहे. अद्याप या हत्याकांडातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर आणि इतर चार जण फरार आहेत. आरोपींपाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, हत्येच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी प्रत्यक्ष हत्येत सहभागी असलेल्या यश पाटील आणि अमित पठाण यांना अटक केली होती. तेव्हा पासून दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
advertisement
दोघांच्या अटकेनंतर कोर्टाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा मकोका न्यायालयात हजार केलं. यानंतर कोर्टाने कोमकर हत्या प्रकरणी सुरुवातीला अटक केलेल्या या दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ केली आहे. अमित पाटोळे आणि यश पाटील यांना कोर्टाने २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आयुष कोमकर याच्यावर पाळत ठेवून प्रत्यक्ष हल्ला करण्यात यश पाटील आणि अमित पाटोळे यांचा सहभाग होता. या प्रकरणात दोघांनी पिस्तूल कुठून आणले? ते दोघं कुणाच्या संपर्कात होते? हल्ला करण्यासाठी त्यांना कुणी सांगितलं? हल्ल्यामागचा मुख्य हेतू काय होता? याबाबत अधिक तपास करायचा असल्याने पुणे पोलिसांनी कोठडी वाढवून देण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. त्यांनतर न्यायालयाने २२ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.