या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह चौदा जणांना अटक केली आहे. हे सर्वजण सध्या पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, आता वनराजची पत्नी सोनाली आंदेकरसह १२ महिलांवर आणि एका पुरुषावर समर्थ नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आयुष कोमकर खून प्रकरणात वनराजची पत्नी सोनाली हिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं.
advertisement
तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. यावेळी तिने पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी १३ जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सोनालीला अटक करून न्यायालयात हजर केलं असता कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात कुणावर गुन्हा दाखल झाला?
या प्रकरणी समर्थनगर पोलिसांनी सोनाली वनराज आंदेकर (३६, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) हिच्यासह प्रियंका कृष्णराज आंदेकर, माया देवळे, येल्लबाबाई कित्तुरकर, लक्ष्मीबाई बेडगिरी, संगीता शिंदे, शारदा साळुंखे, बेबी दोडके, सरुबाई निसारे, कल्पना शिंदे, पूजा शिंदे, स्वाती दोडके, मोहन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.