तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली
ओटीपीद्वारे तत्काळ तिकीट बुकिंगची नवी पद्धत ज्या गाड्यांवर लागू होणार आहे, त्यामध्ये पुणे–अमरावती एक्सप्रेस (11025) आणि पुणे–सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस (12157) यांचा समावेश आहे. तसेच सीएसएमटी–कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (11029), एलटीटी–गोंडा गोदान एक्सप्रेस (11055) आणि एलटीटी–जयनगर एक्सप्रेस (11061) या गाड्यांवरही ही व्यवस्था लागू केली जाणार आहे.
advertisement
मोबाईलवर येणार ओटीपी
नव्या तिकीट बुकिंग व्यवस्थेनुसार प्रवासी आरक्षण काउंटर, अधिकृत एजंट तसेच IRCTCच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून केलेल्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी देणे आवश्यक राहणार आहे. बुकिंगवेळी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकल्यानंतरच तिकीट निश्चित होणार आहे.
ओटीपी पडताळणीदरम्यान अडचण येऊ नये, यासाठी तत्काळ तिकीट बुकिंग करताना प्रवाशांनी स्वतःचा चालू आणि योग्य मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तिकीट बुकिंगची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे.






