पुणे : राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार आणि मातब्बर आणि कसलेले राजकारणी जयंत पाटील यांच्यातील पक्षांतर्गत संघर्षाचा नवा अंक सुरु झाला आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षवाढीसाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणारी शिवस्वराज्य यात्रा रोहित पवार यांच्या मतदारसंघात जाणार नाही. रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा न जाण्यामागे जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील संघर्ष असल्याचे बोलले जात आहे.
advertisement
रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नेमका काय संघर्ष आहे?
लोकसभा निवडणुकांत राष्ट्रवादीला देदीप्यमान यश मिळालं. साहजिक श्रेयवादाची लढाई सुरू झाली. कुणा एकट्यामुळे यश मिळाले नसल्याचे ते अप्रत्यक्षरित्या जयंत पाटलांना म्हणाले. तसेच पक्षसंघटनेत जबाबदारी दिली तर चांगलं काम करेन, असे म्हणत अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं. इथे त्यांची गाठ पडली राजकारण कोळून प्यायलेले जयंत पाटील यांच्याशी...पण त्यांनी रोहित पवार टप्प्यात येण्याची वाट पाहिली.
लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड, भाजप आमदाराचे वक्तव्य
रोहित पवारांच्या जाहीर भूमिकेनंतर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला. जयंत पाटील काही दिवस नाराज झाले. याची दखल थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली. जयंत पाटील यांची नाराजी पक्षाला आणि संघटनेला परवडणारी नाही, अशा सूचना रोहित पवार यांना देण्यात आल्या. तेव्हापासून मात्र रोहित पवार काहीसे शांत झालेत.
विधानसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात जात आहे. विशेषत: जिथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तसेच जिथे राष्ट्रवादी लढणार आहे अशा मतदारसंघात जाऊन जनतेला मतदान करण्याचे आवाहन यात्रेच्या माध्यमातून केले जात आहे. असे असताना जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली यात्रा कर्जत जामखेडला का जाणार नाही, दोघांमधील संघर्ष एवढा टोकाला गेलाय का? टोकाला गेलेला संघर्ष वरिष्ठ नेत्यांनी मिटवला नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
बडा नेता शरद पवार यांच्या भेटीला, विधानसभेची उमेदवारी मागितली
रोहित पवार सध्या बॅकफूटवर!
लोकसभा निवडणुका असो वा विधानसभेच अधिवेशन असो रोहित पवारांचा प्रचंड आक्रमक अवतार महाराष्ट्राने पाहिला. अजितदादा भाजपसोबत गेल्यानंतर रोहित पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते बनले. अवतीभवती कार्यकर्त्यांची गर्दी, आजोबांना साथ दिल्याने निष्ठेची चर्चा आणि दररोजच्या डझनभर ट्विटमधून फुटीर नेत्यांवर केलेली टीका... रोहित पवारांच्या महत्त्वकांक्षा वाढीस लागण्याचाच हा काळ.... गेली वर्षभर त्यांच्या राजकीय कारकीर्दीने बाळसं धरलेलं असताना सध्या रोहित पवार मात्र अचानक बॅकफूटवर गेलेत!
