VIDEO: लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड, भाजप आमदाराचे वक्तव्य
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Tekchand Sawarkar: विरोधकांच्या टीकेचा राज्य सरकारवर कुठलाही परिणाम होत नाही. व्हिडीओ व्हायरल करणे हे विरोधकांचे कामच आहे, असे टेकचंद सावरकर म्हणाले.
नागपूर : लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे असे वक्तव्य कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले. त्यांच्या याच भाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. दुसरीकडे विरोधी पक्ष नेते विजय पाटील यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर करत भाजपचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका केली. यावर आमदार टेकचंद सावरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
महिलांना आर्थिक संपन्न करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांना देखील एकत्र आणलं आहे. शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जुगाड केला आहे. मतदानसाठी ही योजना आहे असा त्याचा अर्थ होत नाही. मी हिंदीत भाषण देत होतो. त्यामुळे माझ्या भाषणाचा विपर्यास केला जात आहे, अशी सारवासारव आमदार टेकचंद सावरकर यांनी विरोधकांच्या टीकेनंतर केली.
advertisement
अखेर महायुतीची भानगड पुढे आली!
महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे.
भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. pic.twitter.com/EL6d0Jc6vW
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 24, 2024
advertisement
काँग्रेस नेते सुनील केदार यांनी ही योजना बंद करण्याचे वक्तव्य केले आहे. तसेच काँग्रेसच्या संबंधित काही लोक ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयात देखील गेले आहेत. काँग्रेस जवळ काहीच नाही म्हणून एडिट करून व्हिडीओ व्हायरल करताहेत. मी अनेक मेळाव्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार केला आहे.
विधानसभा निवडणुकीत आम्हाला योजनेचा फायदा होणार
विरोधकांच्या टीकेचा राज्य सरकारवर कुठलाही परिणाम होत नाही. व्हिडीओ व्हायरल करणे हे विरोधकांचे कामच आहे. ही योजना जुमला आहे असं विरोधक म्हणायचे. सरकारी योजना लोकांना लाभ देण्यासाठी असतात. राज्यातील जनता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर प्रचंड खुश आहे. त्यामुळे याचा येणाऱ्या काळात फायदा होऊ शकतो, असेही आमदार टेकचंद सावरकर म्हणाले.
advertisement
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा टेकचंद सावरकर यांच्यावर हल्लाबोल
view commentsदुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टेकचंद सावरकर यांच्यावर बोचरी टीका केली. महायुतीची भानगड पुढे आली असून त्यांना मतांचा दुष्काळ आहे. म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे, असे भाजपच्या या आमदाराने मान्य केलं. महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
September 24, 2024 7:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
VIDEO: लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड, भाजप आमदाराचे वक्तव्य


