TRENDING:

दिल्ली स्फोटासाठी वापरला 'पुणे पॅटर्न', 2012चा प्लॅन लाल किल्ल्यावर रीपीट, JM रोडवर काय घडलं होतं?

Last Updated:

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा समोर आला आहे. दिल्लीत झालेला स्फोट हा २०१२ साली पुण्यात घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी मिळतेजुळते आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा समोर आला आहे. प्राथमिक तपासानुसार, या हल्ल्यात अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल अर्थात ANFO सारख्या शक्तिशाली स्फोटकांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिक टीमनुसार हा हाय-एक्स्प्लोसिव्ह ब्लास्ट होता, मात्र स्फोट “वरच्या दिशेने” झाल्याने जमिनीवर खड्डा निर्माण झाला नाही. पण ज्वलनशील पदार्थांचा मोठा स्फोट घडून मोठी जिवीतहानी झाली.
News18
News18
advertisement

सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यासाठी नवीन प्रकारची हायटेक पद्धत वापरल्याचं बोललं जात होतं. मात्र ANFO ही पद्धत यापूर्वीच पुण्यात वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २०१२ साली पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर साखळी बॉम्बस्फोटाचा कट उघडकीस आला होता.

जंगली महाराज रस्त्यावर सहा बॉम्ब ठेवण्यात आले होते. यातील चार उपकरणांचा स्फोट झाला नाही. परिणामी कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. पण ज्या दोन उपकरणांमध्ये स्फोट झाला. यात सापडलेले स्फोटक अवशेष दिल्ली स्फोटातील अवशेषाशी साम्य आहेत. २०१२ मध्ये पुण्यातील वर्दळीच्या जंगली महाराज रोडवर कमी तीव्रतेच्या बॉम्बस्फोटांची मालिका झाली होती. पण आता दिल्लीत अशाच प्रकारचा पॅटर्न वापरून मोठा स्फोट घडवण्यात आला आहे. त्यावेळी हल्लेखोरांना पुण्यात जे जमलं नाही, तो प्लॅन दिल्लीत यशस्वी केला आहे. आता याचा सविस्तर तपास फॉरेन्सिक टीमकडून केला जात आहे.

advertisement

फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंध

या स्फोटाचा फरीदाबाद मॉड्यूलशी थेट संबंध असल्याचं तपासातून समोर आलं आहे. 10 नोव्हेंबर रोजी फरीदाबादमधून तब्बल 2,500 किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले होते. या मॉड्यूलमध्ये अनेक डॉक्टर सहभागी होते. पुलवामा येथील रहिवासी असणारा डॉ. मुझम्मिल शकील याने फरीदाबादमध्ये स्फोटकं साठवली होती. तर अनंतनागचा रहिवासी असलेला डॉ. अदील अहमद राथर हा सोशल मीडियावरून युवकांना भडकवण्याचं काम करत होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमचं लग्न ठरायला येत आहेत अडथळे? मग करा हे उपाय, मिळेल नक्कीच लाभ, Video
सर्व पहा

दुसरीकडे, डॉ. शाहीन शाहिद, जिने आपल्या कारमधून शस्त्रांची वाहतूक केली होती. या सर्वांचा संबंध एका विस्तृत दहशतवादी नेटवर्कशी असल्याचा पोलिसांचा संशय असून, तपास राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. शाहिना ही दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या महिला विंगची भारतातील प्रमुख असून भारतात दहशतवादी नेटवर्क वाढवण्याचं काम तिला देण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
दिल्ली स्फोटासाठी वापरला 'पुणे पॅटर्न', 2012चा प्लॅन लाल किल्ल्यावर रीपीट, JM रोडवर काय घडलं होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल