प्रवाशांना यामुळे मोठा आर्थिक ताण बसला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी अनेक विद्यार्थी आणि नोकरदार इतर शहरांकडे प्रवास करतात. दिवाळीच्या सणानिमित्त हजारो नागरिक आपल्या गावी जातात. मात्र, शहरातून विदर्भ आणि मराठवाडा येथे जाणाऱ्या बस चालकाशी तिकीट दर दुपटीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.
एसटी महामंडळाने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बस सुविधा दिल्या आहेत, पण त्या देखील काही दिवसांतच फुल्ल बुक झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना फक्त खासगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून रहावे लागले आहे. अनेकांनी तर काही महिन्यांपूर्वीच लांब पल्ल्याच्या प्रवासाची बुकिंग केली होती, पण आता देखील दिवाळीच्या काळात तिकीट महाग झाले आहे.
advertisement
सध्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दर दुपटी ते तिप्पट केल्याचे दिसून आले आहे. उदाहरणार्थ, शहरातून नागपूरला जाण्यासाठी आधी साधारण 1700 ते 2000 रुपये तिकीट लागायचे, तर आता ते थेट साडेतीन ते चार हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. नियमांनुसार, खासगी ट्रॅव्हल्स चालकांना एसटी बसच्या तिकीट दराच्या दीडपट इतकेच तिकीट घेता येणे अपेक्षित आहे, पण त्यांनी हे नियम पाळलेले नाही. यामुळे नागरिकांना गावी जाण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागणार आहेत.
काही लोक विचार करीत आहेत की एवढ्या महागाईत गावी जावे की नाही. नागरिक आता अशा बस चालकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून प्रवाशांचे वित्तीय ओझे कमी होईल आणि दिवाळीचा सण सगळ्यांसाठी सुखद राहील. संपूर्ण चित्र पाहता दिवाळीच्या काळात प्रवास करताना तिकीट दराची योग्य माहिती घेणे आणि शक्य असल्यास आधीच बुकिंग करणे गरजेचे आहे