येणाऱ्या 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान श्रीक्षेत्र जेजुरी येथे चंपाषष्ठीची यात्रा पार पडणार आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने एसटीच्या पुणे विभागाने अतिरिक्त बस सेवांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेच्या काळात विविध आगारांतून जेजुरीकडे जाणाऱ्या खास बस फेऱ्या चालवून भाविकांच्या प्रवासाची सोय सुरळीत राहावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
advertisement
Mumbai Metro : दिव्यांग प्रवाशांसाठी गूड न्यूज, तिकीटात मिळणार 25 टक्के सूट, मेट्रो 3 कडून निर्णय
26 नोव्हेंबरला चंपाषष्ठी यात्रेसाठी पुणे विभागातील शिवाजीनगर (वाकडेवाडी), स्वारगेट, भोर, शिरूर, नारायणगाव, बारामती, राजगुरुनगर, तळेगाव, इंदापूर, दौंड, सासवड, पिंपरी-चिंचवड आणि मंचर या आगारांतून जेजुरीकडे अतिरिक्त बस फेऱ्या चालणार आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्यास हडपसर आणि कापूरव्होळ येथूनही विशेष बस सुरू करण्याची तयारी ठेवण्यात आली असून, जादा बसेससंदर्भातील आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.






