ही संतापजनक घटना कोंढवा येथील काकडीवस्ती परिसरात घडली. एका नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती 'गनिमीकावा' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. ही माहिती मिळताच, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ या नराधम बापाला पकडले. संतापलेल्या जमावाने त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर त्याला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले.
advertisement
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल केला. आरोपी पित्याविरोधात 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून तिचं समुपदेशन करण्यात आलं आहे.
पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. बापाने अशाप्रकारे बापलेकीच्या नात्याला कलंक फासल्याने खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.