मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत ही मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत आतापर्यंत पिंपरी चिंचवड – स्वारगेट आणि वनाज – रामवाडी हे दोन मार्ग कार्यान्वित झाले आहेत. तर आता दोन मार्ग प्रस्तावित असून या दोन्ही मार्गांमुळे पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
Pune News: पुणेकरांना दिलासा, भिडे पुलाबाबत मोठा निर्णय, आता या तारखेपर्यंत सुरू राहणार
हडपसर परिसरातील रहिवाशांसाठी खडकीमार्गे बावधनपर्यंतचा प्रवास जलद, सुरक्षित आणि स्वस्त होईल. तर लोणी काळभोर व सासवड रोड परिसरातील नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा अत्यंत सोयीस्कर दुवा उपलब्ध होईल.
असा आहे मार्ग..
पीएमआरडीए कडून मेट्रो 3 अंतर्गत हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग साकारण्यात येतोय. हा मार्ग पुढे हडपसर पर्यंत असणार आहे. आता मेट्रो 2 मध्ये खडकवासला -स्वारगेट -हडपसर -खराडी हा मेट्रो मार्ग देखील असणार आहे. दोन्ही मार्गावरून प्रवाशांना पुढे या दोन उपमार्गांवर जाता येणार आहे.
हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड दोन्ही मार्गांचे एकूण 16 किलोमीटर अंतर आहे. यात एकूण 14 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही उपमार्गांसाठी 5704 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या दोन्ही मार्गांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे.






