या 30 व्या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश असून, त्यामागील छंदिष्ट व्यक्तींच्या गोष्टींनाही सादर करण्यात आले आहे. येथे मांडण्यात आलेल्या वस्तूंमध्ये माऊथ ऑर्गन, चांदीची घड्याळे, जुने कॅमेरे, खनिजे, पेंटिंग्ज, ऐतिहासिक पत्रव्यवहार, जुन्या दिनदर्शिका, तसेच 100 वर्षांपूर्वीची रामायणावरील लिथो पेंटिंग्ज यांचा समावेश आहे.
advertisement
गेटवे ते मांडवा फेरी बोट बंद, मग अलिबागला कसं जायचं, तुमच्याकडे 3 बेस्ट पर्याय, पाहा कोणते
प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरले आहेत 100 वर्षांहून अधिक जुन्या रेडिओचे नमुने, जे गरम केल्यावर सुरू होत असत आणि त्यांना आकाशात अँटेना लावावी लागत असे. आज नामशेष झालेल्या या वस्तू अजूनही कार्यरत स्थितीत पाहायला मिळतात. तसेच विविध देशांतील (जसे की जर्मनी, जपान, इंग्लंड) हार्मोनियम्सचा एक समृद्ध संग्रहही येथे आहे.
या प्रदर्शनामध्ये 16 दुर्मिळ वस्तू संग्राहक सहभागी झाले असून, त्यांनी आपल्या खास संग्रहातील वस्तू सार्वजनिक दर्शनासाठी ठेवल्या आहेत. जगातील विविध प्रकारचे 100 हून अधिक जुने कॅमेरे, हिटलरच्या काळातील वर्तमानपत्रे, ऐतिहासिक पत्रे आणि इतर वस्तू इथे पाहता येतात ज्या इतरत्र कुठेही सहजपणे पाहायला मिळत नाहीत.
या प्रदर्शनाचा उद्देश नागरिकांना या ऐतिहासिक आणि दुर्मिळ वस्तूंबाबत माहिती देणे आणि त्या पाहण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे संयुक्त सचिव श्याम मोटे यांनी केले आहे.