TRENDING:

Harsha Bhogle : दिल्लीच्या स्टेडियमवर जाताना हर्षा भोगले यांना सापडला पेपरचा तुकडा, पुण्यातील बातमी वाचताच हादरले, ट्विट व्हायरल!

Last Updated:

Harsha Bhogle On feeding pigeons : डॉक्टर्स गंभीर फुफ्फुसांच्या आजारांबद्दल ओरडत आहेत. कृपया, आपण कबुतरांना खायला देणं थांबवूया, असं हर्षा भोगले म्हणाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Harsha Bhogle Appeal to stop feeding pigeons : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीत दुसरा कसोटी सामना सुरू आहे. त्यासाठी प्रसिद्ध समालोचक हर्षी भोगले दिल्लीत पोहोचले असून त्यांच्या हाती 12 ऑगस्टचा पेपर हाती लागला. त्यात एक पुण्यातील माजी नगरसेवकाची बातमी होती. ही बातमी वाचून हर्षा भोगले यांना देखील धक्का बसला. त्यानंतर त्यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं. सध्या कबुतराचा मुद्दा चर्चेत असताना हर्षा भोगले यांचं ट्विट चर्चेत आलं आहे.
Harsha Bhogle On feeding pigeons
Harsha Bhogle On feeding pigeons
advertisement

कबुतरांना खायला देणं थांबवा

दिल्लीत मी मैदानावर जाताना लोकांना कबुतरांच्या संपूर्ण टोळीला खायला घालताना पाहून माझे हृदय पिळवटून गेलं. डॉक्टर छतावरून कबुतरांची विष्ठा श्वास घेण्याच्या धोक्यांबद्दल आणि त्यामुळे होऊ शकणाऱ्या गंभीर फुफ्फुसांच्या आजारांबद्दल ओरडत आहेत. कृपया, आपण कबुतरांना खायला देणं थांबवूया, असं हर्षा भोगले म्हणाले.

काय होती बातमी?

advertisement

19 जानेवारी रोजी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर शीतल विजय शिंदे घरी परतण्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे दोन लहान मुलींचा शोकाकुल परिवार होता. शीतलचे वडील, पुण्याचे माजी नगरसेवक शाम मानकर, आता कबुतरांच्या गळतीमुळे फुफ्फुसातील फायब्रोसिसमुळे तिचा मृत्यू का झाला याबद्दल जागरूकता पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत.

कबुतरांमुळे खोकला होतो

advertisement

शीतल 2017 मध्ये आजारी पडू लागली. ज्यासाठी आम्ही स्थानिक डॉक्टर आणि आयुर्वेदिक चिकित्सकांचा सल्ला घेतला. शीतल जिथे राहत होती तिथे वरच्या मजल्यावर लोक कबुतरांसाठी धान्य ठेवत असत. परिणामी, कबुतरांनी तिथे घरटे बांधायला सुरुवात केली. डॉक्टर म्हणाले की कबुतरांमुळे हा खोकला होतो," मानकर म्हणतात.

फुफ्फुसांच्या फायब्रोसिसमुळे मृत्यू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

दरम्यान, मुंबईत कबुतरखान्याची प्रश्न ज्वलंत असताना हर्षी भोगले यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या फुफ्फुसांच्या फायब्रोसिसमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Harsha Bhogle : दिल्लीच्या स्टेडियमवर जाताना हर्षा भोगले यांना सापडला पेपरचा तुकडा, पुण्यातील बातमी वाचताच हादरले, ट्विट व्हायरल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल