सायरन वाजल्यानंतर काय कराल?
1. लाइट्स बंद करा – हवाई हल्ल्याचा धोका असल्यास सायरन वाजवला जातो. अशा वेळी घरातील किंवा कार्यालयातील सर्व लाइट्स बंद करा. उजेड शत्रूला लक्ष्य ओळखण्यास मदत करू शकतो.
Mock Drill: सायरन वाजलं अन् तुम्ही लोकल ट्रेनमध्ये असाल तर काय कराचं?
2. इमारतीतून खाली या – शक्य असल्यास त्वरित खाली उतरा आणि सुरक्षित स्थळी, जसे की पार्किंग एरिया, तात्पुरते एकत्र जमवा.
advertisement
3. इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा – मोबाईल, टीव्ही, वाय-फाय राऊटर इत्यादी उपकरणे शक्य तितकी बंद ठेवा. काही उपकरणे बंद करता येत नसल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवा.
4. जखमींना मदत करा – जर कोणी जखमी झाले असेल, तर प्राथमिक उपचार करून त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्याची तयारी ठेवा.
5. शांत राहा, घाबरू नका – मॉकड्रिल हा सरावाचा भाग आहे. त्यामुळे अफवा पसरवू नका किंवा घाबरून चुकीची पावले उचलू नका.
ही मॉकड्रिल आपली आपत्कालीन तयारी तपासण्यासाठी आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
राज्य शासनाने आतापर्यंत पुण्यात ज्या गजबजलेल्या भागांमध्ये मॉकड्रिल केली जाणार आहे, त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे.
1) फर्ग्युसन कॉलेज, पुणे
2) अॅग्रिकल्चर कॉलेज, शिवाजीनगर
3) शिवाजीनगर रेल्वे स्टेशन
4) पीएमटी वर्कशॉप, स्वारगेट
5) महात्मा फुले मंडई, शुक्रवार पेठ
6) महापालिका आयात कर भवन, शिवाजीनगर
7) एस.पी. कॉलेज, टिळक रोड
8) पुनम रेस्टॉरंट, डेक्कन जिमखाना
9) पीडब्ल्यूडी वर्कशॉप, दापोडी
10) रेल्वे पोलीस मुख्यालय, खडकी
11) बँक ऑफ महाराष्ट्र, लक्ष्मी रोड
12) वेस्टर्न इंडिया हाऊस, लक्ष्मी रोड
13) न्यू इंग्लिश स्कूल, रमण बाग
14) कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड
15) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, मार्केट यार्ड
16) पुणे रेल्वे स्टेशन






