50 वर्षांपासून तिरंगा बनवतंय शेख कुटुंब
पुण्यातील राजेंद्र नगरमध्ये राहणारे मोहम्मद शरीफ शेख यांचे कुटुंब गेले 50 वर्षांपासून तिरंगा बनवण्याचे काम करत आहे. तसेच हे काम करणारी त्याची आता ही चौथी पिढी आहे. देशा प्रति असेललं आपल प्रेम जपत ते हे काम करत आहे. त्यांचे हे झेंडे संपूर्ण शहर भर लावले जातात. तिरंगा बनवण्याच काम ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या 4 महिने आधी पासूनच सुरुवात करतात.
advertisement
स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीमध्ये वेगळा उपक्रम, KDMC ने घेतला पुढाकार!
कसे बनवले जातात तिरंगा?
झेंडे बनवण्यासाठी मंडईतून बांबूच्या काड्या, तिरंगी ताग, जिलेटीन पेपर, भिरभिन्यासाठी तारा अशा वस्तू आणतात. बांबूच्या काड्यांना डिंक लावणे, तिरंगा पेपर चिकटवणे, मग तारांच्या तुकड्यांनी जिलेटीन कागदाचं चक्र लावणे असं हे काम सलग सुरू असतं. कच्च्या माल विशेषत: डिंक, कागदाचे ताग, जिलेटीन पेपर्स जपावे यांची काळजी घ्यावी लागते. अशा पद्धतीने ते तिरंगा बनवण्याच काम करतात.
ही आमची चौथी पिढी आहे झेंडे बनवण्याची माझे सासू सासरे हे 50 वर्षांपासून बनवत आहेत. याच्या मधून काही फायदा नाही ये पण एक देश सेवा होते म्हणून आणि एवढ्या वर्षाची परंपरा म्हणून करतो आहोत. तसंच आज पाहिलं तर महागाई खूप वाढली आहे. पूर्वी 40 ते 50 हजार झेंडे बनवत होतो. परंतु आता महागाई मुळं 10 ते 15 हजारच बनवले जात आहेत. याची तयारी आम्ही 4 महिन्या आधीच करायला सुरुवात करतो. हा झेंडा बाहेर 5 ते 15 रुपयेमध्ये विकला जातो. पण आम्ही हा झेंडा 3 रुपयेमध्ये विकतो. आम्हाला हे परवडत नाही पण देश सेवा म्हणून आणि अभिमान म्हणून करत आहोत, असं शेख कुटुंबीयांची सून ऐमन शेख हिने सांगितल आहे.