जावेद शेख हे उच्चशिक्षित तरुण आहेत. पुण्यातील सिंहगड कॉलेज महाविद्यालयातील त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. घरातूनच सामाजिक कार्याचा वारसा लाभला असल्यामुळे, जावेद शेख यांनी "युसुफ फाउंडेशन"च्या माध्यमातून समाजसेवेला सुरुवात केली. वडील आणि काकांचा वारसा चालवत जावेद यांनी 2020 पासून समाजसेवेत स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवला.
जावेद शेख म्हणाले की, “माझ्या शिक्षणाचा उपयोग शोषित पीडित नागरिकांसाठी व्हावा हाच समाजसेवे मागचा हेतू आहे. पुण्यातील सर्वच स्तरातील तरुणांनी एकत्र येऊन समाजातील वंचित घटकासाठी कार्य केले पाहिजे. त्यांच्या या विचारातूनच ‘युसूफ फाउंडेशन’ची सामाजिक वाटचाल सुरू झाली. पुणे शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये आणि कष्टकरी वस्त्यांमध्ये त्यांनी मोफत वीज जोडण्याची व्यवस्था करून दिली असून, याचा लाभ शेकडो कुटुंबांना झाला आहे. या उपक्रमासाठी त्यांनी स्वतःचा निधी, समाजातील दात्यांचे सहकार्य आणि स्थानिक स्वयंसेवकांची मदत अशा त्रिसूत्री पद्धतीने हे काम उभारले आहे.
advertisement
याशिवाय, शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर त्यांनी ‘खड्डे बुजवण्याची जनसेवा मोहीम’ सुरू केली आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात या समस्येवर प्रशासनाची वाट न पाहता जावेद शेख यांनी स्वतःच्या पुढाकाराने तोडगा काढला. त्यांच्या फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांतील खड्डे स्वतःच्या खर्चाने बुजवले आहेत. अनेक वेळा नागरिकांच्या सूचना घेऊन ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात आणि संबंधित काम पूर्ण करतात.
विद्यार्थ्यांना मोफत संगणक देण्याचा मानस
सध्या महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र याच मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स लर्निंग साठी मोफत संगणक उपलब्ध करून देण्याचा मानस जावेद शेख यांचा आहे.या कार्यामुळे जावेद शेख आणि ‘युसूफ फाउंडेशन’ च्या सेवाभावी कामगिरीला अनेक सामाजिक संस्थांनी गौरविले आहे. शहरातील युवकांसाठी जावेद शेख हि प्रेरणादायी नेतृत्व ठरत आहे.