आंदोलन मध्यरात्री सुमारे तीन वाजेपर्यंत सुरू
कोथरुड पोलीस ठाण्यात आंदोलन मध्यरात्री सुमारे तीन वाजेपर्यंत सुरू होते. मात्र, पोलिस प्रशासनाने संबंधित तपास अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला. या पोलिस भूमिकेचा निषेध म्हणून, आंदोलनकर्त्या मुलींनी पोलिसांनी दिलेले नकाराचे पत्र आयुक्तालयातच फाडून आपला तीव्र संताप व्यक्त केला.
रोहित पवारांचा संताप
advertisement
गुन्हा दाखल व्हावा म्हणून दोन दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत होते. काल रात्री मी स्वतः तसेच अंजलीताई आंबेडकर, प्रशांतदादा जगताप, सुजात आंबेडकर, अनेक सामाजिक कार्यकर्ते, वंचित, काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रात्री 3 वाजेपर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसलो, पण यंत्रणा मात्र तक्रार घ्यायला तयार नव्हत्या, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
झोपलेले गृहमंत्री जागे होतील का? - रोहित पवार
पोलिसांनी तक्रार घेतली नसली तरी जनमताच्या दबावापुढे झुकत पोलिसांकडून तसं लेखी मात्र आम्ही घेतलं. पोलीस यंत्रणा सर्वसामान्यांना अशाच प्रकारे त्रास देणार असेल तर आम्हीही आवाज खाली असाच प्रतिसाद देऊ. झोपलेले गृहमंत्री जागे होतील, ही अपेक्षा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या आंदोलनात सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांच्या या भूमिकेविरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने, आज पुन्हा हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.