वाहतुकीत येणाऱ्या अडचणी अडचणी आणि दैनंदिन गर्दी लक्षात घेऊन नागरिक मंचांकडून भिडे पूल पुन्हा सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. अखेर प्रशासनाने ही मागणी मान्य करत शनिवारपासून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.
'या' वेळेत पुलावरून बिनधास्त प्रवास करा
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भिडे पुलावरून वाहतुकीस परवानगी असेल. मात्र, मेट्रो पुलाच्या बांधकामासाठी आवश्यकतेनुसार रात्री 10 नंतर या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येईल.
advertisement
पोलिस उपआयुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांनी सांगितले की, ''भिडे पुलावरील वाहतुकीचा निर्णय तात्पुरता आहे. पुढील आदेश येईपर्यंत सध्याची वाहतूक व्यवस्था कायम राहील. नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे.'' या निर्णयामुळे डेक्कन, नारायण पेठ, शनिवार पेठ परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.