दिवाळी आणि छट पूजेसाठी विशेष गाड्या सुरू करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले असून पुण्यातून एकूण 1000 विशेष रेल्वे फेऱ्या ठेवल्या जातील. या फेऱ्यांपैकी 165 फेऱ्या हडपसर आणि खडकी स्थानकांवरून सुटणार आहेत. सध्या पुणे स्टेशनवर दररोज सुमारे 150 पेक्षा जास्त ट्रेन चालतात आणि 1 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात ज्यामुळे स्टेशनवर मोठा ताण निर्माण झाला होता.
advertisement
हडपसर टर्मिनलवर चार प्लॅटफॉर्म आणि खडकी टर्मिनलवर तीन प्लॅटफॉर्म तयार केले गेले आहेत. नवीन प्लॅटफॉर्मची मुख्य मार्गाशी जोडणी पूर्ण झाल्याने या दोन्ही स्थानकांहून विशेष गाड्या सुरू करून चाचणी चालू आहे. चाचणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यास त्या सुधारण्यासाठी पुढील काही महिन्यांत उपाययोजना केली जातील.
रेल्वे प्रशासनाने 25 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी आणि छट पूजेसाठी विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. हडपसर टर्मिनलवरून पाच शहरांसाठी आणि खडकी टर्मिनलवरून दोन शहरांसाठी गाड्या धावणार आहेत. या दोन्ही टर्मिनलवरून मिळणाऱ्या 105 फेऱ्यांमुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील ताण आणि गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
यामुळे प्रवाशांना स्टेशनवरून प्रवास करताना वेळ वाचेल तसेच गर्दीतून निर्माण होणाऱ्या असुविधा टळतील. रेल्वे प्रशासनाच्या मते हडपसर आणि खडकी टर्मिनल पुणे शहराच्या रेल्वे नेटवर्कसाठी मोठे योगदान देणार आहेत आणि भविष्यात या सुविधांचा विस्तार करून आणखी शहरांसाठी सेवा वाढवली जाईल.