TRENDING:

ब्युटी पार्लरमध्ये कामाचं आमिष, 1700 किमीवरून दोघींना पुण्यात बोलवलं, 2 वर्षे घरात डांबून तोडले शरीराचे लचके

Last Updated:

Crime in Pune: पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने दोन तरुणींना ब्युटी पार्लरमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून त्यांचा लैंगिक छळ केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने दोन तरुणींना ब्युटी पार्लरमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून त्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ केला आहे. नराधमाने त्यांना घरात डांबून ठेवत त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दलाल आरोपीला अटक केली आहे. छापेमारीत पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली आहे.
News18
News18
advertisement

राजू असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. त्याची पत्नी मीरा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ती पसार झाली आहे. याबाबत २२ वर्षांच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू आणि मीरा यांनी पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना पुण्यात ब्युटी पार्लरमध्ये काम लावून देतो, असे आमिष दाखवलं. दोघींना जवळपास १७०० किलोमीटरचा प्रवास करून पश्चिम बंगालमधील एका गावातून पुण्यात आणलं. दोघींना ब्युटी पार्लरमध्ये काम करायचं होतं, पण आरोपींनी त्यांना पार्लरमध्ये कामाला न लावता दोघींना वेश्याव्यवसायात ढकललं. दोघींनी वेश्याव्यवसाय करायला नकार देताच आरोपींनी त्यांना डांबून ठेवलं. धमकावून शिवीगाळ केली. मारहाण करून छळ केला. तसेच त्यांना उपाशी ठेवले. मागील दोन वर्षांपासून आरोपी त्यांच्याकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेत होते.

advertisement

घटनेला वाचा कशी फुटली?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

आरोपी दलालाने गेल्या आठवड्यात आंबेगाव पठार भागात एका तरुणीला देहव्यापारासाठी आणलं होतं. या तरुणीने संधी साधून मोबाइल क्रमांकावरून पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी तपासपथकाला तरुणीचा शोध घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून आरोपीच्या ताब्यातून फिर्यादी तरुणीसह दोघींची सुटका करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
ब्युटी पार्लरमध्ये कामाचं आमिष, 1700 किमीवरून दोघींना पुण्यात बोलवलं, 2 वर्षे घरात डांबून तोडले शरीराचे लचके
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल