मुंबई शहर आणि उपनगरात 25 फेब्रुवारी रोजी 38.8 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तर 26 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये 39 अंश सेल्सिअस एवढे प्रचंड कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी उष्णतेच्या लाटेपासून स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. मुंबईकर उष्णतेच्या लाटेने हैराण होत असताना पुणेकरांना वाढत्या तापमानापासून काही साथ दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
advertisement
महाशिवरात्रीला उपवास करताय तर ही चूक करू नका! डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
पुण्यामध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश पाहायला मिळेल तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे असेल. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरातही तापमानाचा पारा चढाच असल्याचे पहायला मिळत आहे. तर कोल्हापुरातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता असून किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे असेल.
मराठवाड्यातही तापमान सातत्याने वाढत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये ही तुलनेने अल्हाददायी वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे असेल. उपराजधानी नागपूरमध्ये ही कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान आहे. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून कोकणातील अनेक जिल्ह्यांना पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.