मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल. पुण्यामध्ये उष्णता कायम असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे राहील.
advertisement
मंदीत संधी! Mutual Funds मध्ये गुंतवणुकीची हीच ती वेळ, मिळू शकतो दमदार रिटर्न
पुणे शहरामध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश राहण्याची देखील शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये देखील उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये 18 मार्च रोजी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल. कोल्हापूरातील आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील प्रमुख शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील दोन दिवस निरभ्र आकाश राहील तर 19 मार्च रोजी संभाजीनगरमध्ये तुरळक पावसाची देखील शक्यता आहे. संभाजीनगरातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल.
तर उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर नाशिकमध्ये निरभ्र आकाश राहील आणि कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असेल. विदर्भातील उष्णतेचा कडाका काहीसा कमी होणार आहे. नागपूरमधील कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल.





