गेल्या अनेक शतकांपासून महाराष्ट्राच्या कारभाराची अधिकृत भाषा म्हणून वापरली गेलेली मोडी लिपी पुढे विस्मरणात गेली होती. पण आता कुणबी समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या लिपीतील दप्तरांवर संशोधन सुरू झाले असून मोडी अभ्यासकांना नवा सुवर्णकाळ लाभला आहे.
Kunbi Certificate: 21 ते 45 दिवसांत मिळेल कुणबी प्रमाणपत्र, कसा आणि कुठे करायचा अर्ज? संपूर्ण माहिती
advertisement
देवस्थानांच्या दान नोंदी, वाडवडिलांच्या जमिनी विक्रीखरेदीचे हुकुमनामे, तसेच गहाळ झालेल्या दस्तऐवजांची उकल करण्यासाठी मोडी लिपी वाचनाची मागणी झपाट्याने वाढली आहे. प्रत्येक तहसील कार्यालयातील नोंदी तपासल्या जात असून गावोगावी जुन्या घरात साठवलेली दस्तऐवजांची दप्तरं काढून तपासणी केली जात आहे. शासनाने या कागदपत्रांचे पडताळणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोडी लिपी अभ्यासकांना मोठी संधी उपलब्ध
मोडी लिपी अभ्यासकांना ही एक मोठी संधी आहे. विस्मृतीत गेलेल्या लिपीचे वाचन, अभ्यास व प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूरसारख्या ठिकाणी मोडी लिपीचे विशेष वर्ग सुरू झाले आहेत. अनेक विद्यार्थी, संशोधक आणि तरुण आता या लिपीचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहेत.