पुणे : मराठा आरक्षण शांतता रॅली ही अनेक शहरातून काढली जात आहे. हीच रॅली आज सारसबाग येथुन पुरम चौक बाजीराव रोड, शनिपार सेवा, सदन चौक, आप्पा बळवंत चौक, फुटका बुरुज, गाडगीळ पुतळा, शिवाजी पुल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसएसपीएमएस, स. गो. बर्वे चौक डावीकळे वळण घेवुन जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक, नटराज चौक, गरवारे पुल-छत्रपती संभाजी पुतळा येथे समाप्त होणार आहे.
advertisement
रॅलीमुळे जेधे चौक परिसर, सोलापुर रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, जेएम रोड, कर्वे रोड, तसेच खंडोजी बाबा चौक या परिसरामधील वाहतुकीमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने खालील ठिकाणांहुन वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व चौकामधुन वाहतुक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येईल.
नवले पुल वाहतुकीचा आढावा घेऊन नवले पुलाकडून येणारी वाहतुक नवीन बोगद्याकडे डायव्हर्शन करण्यात येईल. खडीमशीन चौक जड वाहने कात्रजकडे न सोडता बोपदेव घाटाकडे जातील. ही रॅली कात्रज चौक ते होल्गा चौक येताना रॅली पुढे जाईल तशी पाठीमागे वाहतुक सोडण्यात येईल. सिंहगड रोडवरील वाहतुक डायव्हर्शन, जेधे चौक ते सिंहगड रोड वाहतुक व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक आणि सावरकर चौक अशी जाईल.
दांडेकर पूल -
सिंहगडरोड कडून येणारे वाहतुक दांडेकर पुल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक आणि व्होल्गा चौक असे जाईल. निलायम पुलाखाली सावरकर पुतळ्याकडे वाहतुक बंद राहील. ना. सी. फडके चौक सणस पुतळ्याकडे वाहतुक बंद राहील. एस. पी. कॉलेज चौक पुरम चौकाकडे वाहतुक बंद राहील. जेधे चौकामध्ये आवश्यक वेळी करण्यात येणारे वाहतुक डायव्हर्शन शिवाजी रोड-राष्ट्रभूषण चौक वाहने वेगा सेंटर मार्गे जाईल. सेवन लय चौक जेधे चौकाकडे वाहने वाहतुक बंद राहील. वाहतुक मार्केट यार्ड किंवा पुणे स्टेशनकडे नेहरू रोडने जाईल. मार्केटयार्ड जंक्शन वाहने जेधे चौकाकडे वाहतुक बंद राहील. वाहतुक वखार महामंडळामार्गे जाईल. पंचमी चौक ते जेधे चौकाकडे वाहतुक बंद राहील.
श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको! नागाला दूध पाजावं का? सर्पमित्रांनी दिली महत्त्वाची माहिती
सातारा रोड -
पंचमी ते शिवदर्शन चौक, शिवदर्शन ते गजानन महाराज मंदीर चौक ते निलायम टॉकीज मार्गे जाईल. शिवदर्शन चौक मित्रमंडळ चौकाकडे वाहतुक बंद राहील. रॅली निघाल्यानंतर करण्यात येणारे डायव्हर्शन शनिपार चौक-कुमठेकर रोड-शनिपार चौक वाहतुक बंद राहील. बेलबाग चौक, लक्ष्मी रोड, बेलबाग चौक वाहतूक बंद राहील. केळकर रोड टकले हवेली चौक अप्पा बळवंत चौकाकडे वाहतुक बंद राहील.
बुधवार चौक अप्पा बळवंत चौकाकडे वाहतुक बंद राहील. जिजामाता चौक फुटका बुरूजकडे वाहतुक बंद राहील. जयवंतराव टिळक पुल शनिवार वाड्याकडे वाहतुक बंद राहील. कुंभारवेस चौक गाडगीळ पुतळ्याकडे वाहतुक बंद राहील. मंगला टॉकीज प्रिमिअर गॅरेजकडे वाहतूक बंद राहील. खुडे चौक प्रिमिअर गॅरेजकडे वाहतुक बंद राहील. शिवाजी पुतळा चौक शिवाजीनगर कोर्टकडून येणारी वाहतुक बंद राहील. स. गो. बर्वे चौक संपूर्ण वाहतुक शिमला ऑफीस चौक मार्गे जाईल. रेव्हेन्यू कॉलनी जंक्शन मॉर्डन चौकाकडे वाहतुक बंद राहील. झाशी राणी, सावरकर भवन चौक वाहतुक ओंकारेश्वर पुल मार्गे जाईल. महात्मा फुले संग्रहालय, झाशी राणी चौकाकडे वाहतुक बंद राहील.
मूलबाळ होत नसेल तर केला जातो नवस, मराठवाड्यातील सक्रोबा पूजा माहितीये का?
ही रॅली जंगली महाराज रोडवर आल्यानंतर डायव्हर्शन पॉईंट गुडलक चौक नटराज चौकाकडे वाहतुक बंद राहील. भांडारकर रोडकडून येणारी वाहतुक एफ. सी. रोड मार्गे जातील. झेड बीज केळकर रोड वरून वाहतुक बंद राहील. भिडे पुल, पुलाची वाडी येथून जंगली महाराज रोडला वाहतुक बंद राहील. नळस्टॉप चौक खंडोजीबाबा चौक कडे वाहतुक बंद राहील. रसशाळा चौक एसएम जोशी पुलाकडील वाहने नळस्टॉप मार्गे जातील. डेक्कन पो. स्टे (शेलारमामा चौक) शेलारमामा चौकाकडून खंडोजीबाबा चौकाकडे वाहतुक बंद राहील. रॅली खंडोजीबाबा चौकात आल्यानंतर, टिळक चौक खंडोजीबाबा चौकाकडे वाहतुक बंद राहील. वाहतुक कुमठेकर रोड आणि टिळक रोड मार्गे सोडली जातील. तसेच रॅली जशी पुढे जाईल त्याप्रमाणे पाठीमागील चौक वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील, असे आदेश वाहतूक पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी दिले आहेत.