TRENDING:

दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाईंची टीम घेतेय मेहनत, पुण्यात यंदा मीनाक्षी मंदिराचा अतुलनीय देखावा पाहायला मिळणार, VIDEO

Last Updated:

देसाई यांची टीमने त्यांचे काम पुढे नेत वेगवेगळ्या कलाकृती तयार करण्यासाठी परिश्रम करत आहे, अशी प्रतिक्रिया नितीन देसाई यांचे निकटवर्तीय श्रीकांत डोंगरदिवे यांनी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
advertisement

पुणे : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. आकर्षक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील बाबू गेनू मंडळ ट्रस्टच्या दरवर्षीच्या देखाव्याची चर्चाही सर्वत्र होत असते. यंदाही या गणेश मंडळाने आकर्षक असा मीनाक्षी मंदिराचा देखावा सादर केला आहे. त्याची तयारीही सुरू आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.

पुण्यातील 47 वर्षे जुने मंडळ तसेच थोर क्रांतिकारक बाबू गेणु यांच्या नावाने या गणेश मंडळाची स्थापना झाली. आपल्या संस्कृतीचे विराट दर्शन व्हावे, यासाठी मंडळ सातत्याने नवीन काहीतरी करत असते. यावर्षीही या मंडळातील कलाकृती बनवण्याचं काम हे दिवंगत नितीन देसाई यांच्या टीमकडे आहे. गेल्या महिनाभरापासून याठिकाणी 50 कामगार मेहनत घेत आहेत. तब्बल 64 फुट इतक्या उंचीचे हे मंदिर आकर्षक असे वाटत आहे.

advertisement

ठाण्यातील या मार्केटमध्ये बाप्पासाठी आले सुंदर हार, मुकुट, अगदीच स्वस्त किमतीत, कुठे आहे हे ठिकाण, VIDEO

गेल्या अनेक वर्षांपासून विश्वविख्यात कला दिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई हेच या मंडळाचे देखावे तयार करत. मागील वर्षीचा देखावा हा नितीन देसाई यांचा शेवटचा देखावा या मंडळासाठीचा ठरला. मात्र, देसाई यांची टीमने त्यांचे काम पुढे नेत वेगवेगळ्या कलाकृती तयार करण्यासाठी परिश्रम करत आहे, अशी प्रतिक्रिया नितीन देसाई यांचे निकटवर्तीय श्रीकांत डोंगरदिवे यांनी दिली.

advertisement

Ganeshotsav Pune : गणपतीसाठी सुंदर देखावे सेट घ्यायचेय तर पुण्यातील हे ठिकाण तुमच्या कामाचं, VIDEO

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंबाचे दरही तेजीत, आल्याची काय स्थिती?
सर्व पहा

सात्त्विक रंगसंगतीनं नटलेली, उंचीपुरी नक्षीदार, आकाशाला सुशोभित करीत ढगांना भिडणारी तसेच अस्सल द्रविड शैलीच्या गोपुरांची टोक असणारे मंदिर म्हणजेच मदुराई मधील मीनाक्षी मंदिर आहे. मीनाक्षी मंदिर हे भारतातील तमिळनाडू जिल्ह्यातील मदुराई येथील मंदिर आहे. याला अरुल्मिगु मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर किंवा मीनाक्षी अम्मन थिरुक्कोविल असे म्हणतात. या अतुलनीय व अप्रतिम अशा कलाविष्काराची अनुभूती यावेळी पुणेकरांना नक्कीच अनुभवायला मिळेल, यात काही शंका नाही.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाईंची टीम घेतेय मेहनत, पुण्यात यंदा मीनाक्षी मंदिराचा अतुलनीय देखावा पाहायला मिळणार, VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल