ठाण्यातील या मार्केटमध्ये बाप्पासाठी आले सुंदर हार, मुकुट, अगदीच स्वस्त किमतीत, कुठे आहे हे ठिकाण, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
या दुकानात गणपती बाप्पाला घालण्यासाठी सुंदर कंठी उपलब्ध आहे. यामध्ये मोत्याची कंठी, हिऱ्यांची कंठी वेगवेगळ्या रंगांच्या कंठी उपलब्ध आहेत. या कंठींची किंमत फक्त 150 रुपयांपासून सुरू होते.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. ठाण्यातील मार्केटमध्येही सध्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या सजावटीच्या अनेक वस्तू मार्केटमध्ये आलेल्या आहेत. गणपती बाप्पा जेव्हा घरी येतात, तेव्हा गणेश मूर्तीला वेगवेगळे हार, मोती या गोष्टींनी सजवले जाते.
अनेकांना, बाप्पाला वेगवेगळ्या मुकुट आणि हारांनी सजवण्याची आवड असते. तुम्हालाही तुमच्या बाप्पाला सुंदर गोष्टींनी सजवायचा असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाण्याच्या विठ्ठल मंदिर गल्लीच्या मार्केटमध्ये अगदी स्वस्त किमतीत मिळतील.
advertisement
या विठ्ठल मंदिर गल्लीमध्ये पूजा भंडार म्हणून दुकान आहे. या दुकानात गणपती बाप्पाला घालण्यासाठी सुंदर कंठी उपलब्ध आहे. यामध्ये मोत्याची कंठी, हिऱ्यांची कंठी वेगवेगळ्या रंगांच्या कंठी उपलब्ध आहेत. या कंठींची किंमत फक्त 150 रुपयांपासून सुरू होते. मोत्याचे हार असतील किंवा मोत्याच्या माळा या सगळ्या वस्तू अनेक व्हरायटीत उपलब्ध आहेत.
बाप्पाच्या कंठीमध्ये इथे 500हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. गणपतीच्या वेगवेगळ्या कंठी सोबतच सुंदर मुकुटसुद्धा इथे उपलब्ध आहेत. यांची किंमत फक्त 100 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
'आमच्या इथे गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत. बाप्पाच्या सजावटीसाठी महत्त्वाची असणारी कंठी आमच्याकडे खूप व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे. त्यासोबत छोट्या बाप्पापासून ते 10 फुटाच्या गणेश मूर्तीपर्यंत आमच्याकडे सर्व लांबीच्या कंठी उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या डिझाईन सुद्धा मिळतील,' असे पूजा भंडारचे दुकानदार पप्पू यांनी सांगितले.
advertisement
तुम्हालाही तुमच्या बाप्पाचा लुक अगदी सुंदर करायचा असेल तर तुम्हीही ठाण्यातील या विठ्ठल मंदिर गल्लीला भेट देऊ शकता आणि बाप्पाच्या सजावटीच्या वस्तू खरेदी करू शकतात.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 29, 2024 5:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
ठाण्यातील या मार्केटमध्ये बाप्पासाठी आले सुंदर हार, मुकुट, अगदीच स्वस्त किमतीत, कुठे आहे हे ठिकाण, VIDEO

