आकर्षक आणि सुंदर असे महालक्ष्मी मुखवटे, भरपूर व्हरायटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये याठिकाणी उपलब्ध, VIDEO

Last Updated:

तुम्हाला महालक्ष्मीचे जर मुखवटे खरेदी करायचे असतील तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरात अगदी स्वस्त दरात मुखवटे खरेदी करू शकता. याचबाबत लोकल18 घेतलेला हा आढावा.

+
महालक्ष्मी

महालक्ष्मी मुखवटे

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिना सुरू झाला की, सणांना सुरुवात होते. जन्माष्टमीनंतर आता लवकरच गौरी आणि गणपती येणार आहेत. त्यांच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. त्यांच्या स्वागताची सगळी तयारी केली जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला गौराईचे अर्थात महालक्ष्मीचे जर मुखवटे खरेदी करायचे असतील तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरात अगदी स्वस्त दरात मुखवटे खरेदी करू शकता. याचबाबत लोकल18 घेतलेला हा आढावा.
advertisement
आता लवकरच महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तर त्यासाठी जर तुम्हाला सुंदर छान असेल आकर्षक मुखवटे खरेदी करायचे असतील तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी आणि पानदरिबाग या ठिकाणी जाऊन हे मुखवटे खरेदी करू शकता. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे मुखवटे हे उपलब्ध आहेत.
या ठिकाणी तुम्हाला अमरावती पॅटर्नचे मुखवटे त्याचबरोबर पेन पॅटर्नचे मुखवटे तसंच चिखलीचे मुखवटे, अकोला साईडचे मुखवटे अशा विविध प्रकारचे मुखवटे या ठिकाणी उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला मॅट फिनिशमध्ये. तसेच तुम्हाला वार्निश फिनिश असलेले मुखवटे. आणि साधी मुखवटे देखील उपलब्ध आहेत.
advertisement
ज्या मुखावट्यांना वार्निशने फिनिशिंग केलेली आहे ते मुखवटे तुम्ही पाणी लावून देखील साफ करू शकता. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मुखवटे खराब होण्याचे भीती नाही. पण जे मॅट फिनिशमधील मुखवटे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित कोरड्या कपड्याने साफ करून घ्यावे लागतील. जर तुम्ही या मुखवट्यांना ओल्या कपड्याने साफ केले तर हे खराब होण्याची शक्यता असते.
advertisement
3 वर्षांपूर्वी आईचे निधन, वडील सुरक्षा रक्षक; पण पोरानं करुनचं दाखवलं!, सोलापूरचा रोहित बनला PSI
या ठिकाणी तुम्हाला 1 हजार रुपयांपासून ते 7 हजार रुपयांपर्यंत मुखवटे खरेदी करता येतील. तसेच या ठिकाणी तुम्हाला महालक्ष्मीसाठी लागणारे हातदेखील उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला हातामध्येही भरपूर असे प्रकार उपलब्ध आहेत, अशी माहिती व्यापारी धर्मेश वर्मा यांनी दिली.
advertisement
या ठिकाणी कोथळ्याही उपलब्ध आहेत आणि पिल्लांसाठी लागणारे जे ड्रेसही या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला जर हे सर्व साहित्य खरेदी करायचे असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी आणि पानदरीबाग या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आकर्षक आणि सुंदर असे महालक्ष्मी मुखवटे, भरपूर व्हरायटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये याठिकाणी उपलब्ध, VIDEO
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement