विविध योजनांअंतर्गत उपलब्ध सदनिका (फ्लॅट्स)
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून विविध योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणात सदनिका (फ्लॅट्स) उपलब्ध आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत 1 हजार 683 सदनिका, तर ‘प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय)’ अंतर्गत 299 सदनिका उपलब्ध आहेत. तसेच 15 टक्के आणि 20 टक्के आरक्षणाच्या योजनांमधील एकूण 4 हजार 186 सदनिका जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिका हद्दीत 1 हजार 538, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1 हजार 534 आणि पीएमआरडीए हद्दीत 1 हजार 114 सदनिका उपलब्ध आहेत. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी www.housing.mhada.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.
advertisement
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावरील सदनिकांसाठी अर्ज करण्यासाठी नागरिकांनी www.bookmyhome.mhada.gov.in किंवा lottery.mhada.gov.in ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अर्ज प्रक्रियेबाबत काही अडचण असल्यास 022-69468100 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. राहुल साकोरे यांनी सांगितले आहे की, म्हाडाने सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार किंवा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदारांनी अशा व्यक्तींशी व्यवहार करू नये. अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी म्हाडा किंवा पुणे मंडळ कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.






